
फोटो सौजन्य सोशल मिडिया
मनसेचा आरोप- सेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी घणसोली सेक्टर-४ मधील सिडकोच्या भूखंडावर अनधिकृत कब्जा करून कार्यालय सुरू केल्याचा आरोप केला आहे. थील अनधिकृत प्रकल्पांमध्ये किंवा घरांच्या आगाऊ बुकिंगच्या (Advance Booking) नावाखाली ग्राहकांकडून लाखो रुपये उकळले जात असल्याचे समोर आले आहे. घणसोली आणि तळवली परिसरात यापूर्वीही सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने अनधिकृत बांधकामे व कार्यालयांवर हातोडा टाकला आहे, परंतु अद्यापही अनेक ठिकाणी अशा अनधिकृत हालचाली सुरू असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
Accident News: ‘हेल्प… हेल्प…’च्या आर्त हाका! इम्पेरियल हाइट्सच्या आगीत दोन महिलांचा मृत्यू
गोर-गरिब आणि प्रकल्पग्रस्ताच्या घरावर बुलडोजर चालवणारी सिडको, इथे शांत का दिसत आहेत. सिडकोचे सेक्टर 04 मध्ये प्लाट नंबर 301 , 307, 308, 311 हे प्लॅाट वितरीत झाले नसून इथे अनधिकृतरित्या बिल्डर्सचे ऑफिस सुरू आहेत. सिडको अधिकारी विनू नायर यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही.
कृष्णा इमपेरियर आणि सृष्टी बिल्डर तर्फे बुकिंग ऑफिस टाकण्यात आले आहेत. पत्रे आणि बोर्ड लावण्यात आले असून हे बिल्डर लोकांकडून बुकिंग अमांऊट घेत आहेत. या कडे सिडकोचे आणि सिडको अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहेत. एमआरपिटी अॅक्ट नुसार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, सिडको अधिकारी नायर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.या प्रकरणा मागे कोनाचे तरी पाठबळ आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केले.