अमरावती : संपूर्ण विदर्भात पाऊस सुरू असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या २-३ दिवसापासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे चांदुर बाजार तालुक्यातील फुबगाव येथे घराची भिंत कोसळल्याने पाच जण दबल्या गेले. या दुर्घटनेत मायलेकीचा मृत्यू झाला असून तिन जणांना बाहेर काढण्यात आलं आहे.
[read_also content=”दिग्रसच्या तरूणाची पुसद येथे निर्घृण हत्या, २० ते २५ जणांनी संगणमताने काढला वचपा https://www.navarashtra.com/maharashtra/brutal-murder-of-digras-youth-at-pusad-20-to-25-people-abducted-nraa-305724/https://www.navarashtra.com/maharashtra/brutal-murder-of-digras-youth-at-pusad-20-to-25-people-abducted-nraa-305724.html”]
अमरावतीमध्ये आज पहाटेच्या सुमारास मुसळधार (Amravati Rain) पावसामुळे घर कोसळलं. या वेळी घरात असणारे पाचही जण भिंतीखाली दबले गेले. विटा आणि मातीच्या भिंती खाली दबल्या गेल्याने आई-मुलगी यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. यानंतर लगेचच स्थानिक बचाव पथकाला आणि यंत्रणांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनीही घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्य केलं. एकूण पाच जण दबले असल्याची माहिती बचाव पथकाला मिळाली होती. मात्र पाच पैकी तिघांनाच वाचवण्यात यश आलं. तर दोघांचा मृत्यू झाला.
[read_also content=”आरबीआयचे रायगड सहकारी बँकेवर निर्बंध; खात्यातून केवळ १५ हजार काढता येणार https://www.navarashtra.com/maharashtra/rbi-restrictions-on-raigad-cooperative-bank-so-only-15-thousand-can-be-withdrawn-from-the-account-nrgm-305695.html”]