मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल. चाकरमान्यांना वेळेत आणि कमी खर्चाच पोहोचवणारी एकमेव वाहतूक अर्थाततच मुंबई लोकल. याचे आजवर अनेक चांगले वाईट किस्से आहेत. सध्या एक अशीच विचित्र घटना घडली आहे ती म्हणजे नवी मुंबईमध्ये. धावत्या लोकलमध्ये एका मोटारमनची अचानक तब्येत बिघडली. कर्तव्य बजावत असाताना या मोटारमनला अचानक अस्वस्थ वाटू लागलं होतं. मात्र एवढ्या प्रवाशांच्या जीवाची जबाबदारी त्याच्यावर होती. या मोटारमनने प्रसंगावधान राखत आणि मोठ्या हिमतीने लोकल बेलापूर स्थानकात सुखरुप पोहोचवली.
सीएसएमटी वरुन पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या या लोकलमध्ये शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास ही गंभीर घटना घडली. बेलापूर स्थानकाच्या जवळ येतानाचा मोटारमन सी. मोडक यांना अचानक उलट्यांचा त्रास व्हायला लागला. अचानक त्यांची तब्येत बिघडली. मात्र ऐनवेळी काहीही न करता त्यांना हिंमतीने लोकल बेलापूर स्थानकात आणल्यानंतर लोकल कर्मचाऱ्य़ांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मोटारमन सी. मोडक यांच्या प्रसंगावधानामुळे लाखो प्रवाशांचे प्राण वाचले.
लोकल ही मुंबईची वाहिनी आहे. दिवसभारात एका लोकलमध्ये लाखो प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे या अशा घटना गंभीर आहेत. म्हणूनच रेल्वेप्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत जागरुक असणं गरजेचं आहे. अनेक मोटारमन किंनवा रेल्वे कर्माचारी असे आहेत जे डबल शिफ्ट करतात. याचा परिणाम आरोग्यावर होतो परिणामी यासगळ्याचा गंभीर फटका लोकलवर होतो. त्यामुळे काल आला पण वेळ नव्हती आली. मात्र अशा गंभीर घटनांची दखल प्रशासनाने वेळीच घ्यायला हवी अशी मागणी प्रवासी संघटनेकडून होत आहे.