नवराष्ट्रच्या बातमीचा Impact: मंदिर वाचवण्यासाठी रस्त्यावर हिंदू संघटना; काँग्रेस-शिवसेना एकवटली, भाजपविरोधी वातावरण
भाईंदर पूर्वेतील २५ वर्षे जुने हनुमान मंदिर विकास प्राधिकरणाच्या कारवाईनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. विकास प्राधिकरणाने मंदिराचा वीजपुरवठा खंडित केला. मंदिरांच्या दरवाजाला टाळेही ठोकण्यात आले. ही बातमी वाऱ्यासारखी परसरली. त्यानंतर हिंदू संघटना संतप्त होऊन रस्त्यावर उतरल्या होत्या.
Navi Mumbai Crime: नवी मुंबई हादरलं! चारित्र्याच्या संशायावरून वाद विकोपला आणि…; पतीनेच केली पत्नीची
नवराष्ट्र वृत्तसमुहाने या घडामोडींची दखल घेत बातमी प्रसिद्ध केली. नवराष्ट्रच्या बातमीनंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व काँग्रेस पदाधिकारी यांनी हस्तक्षेप केला. सरनाईक यांनी मंदिर कायम ठेवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर भक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण त्याचवेळी या प्रकरणामुळे मिरा-भाईंदरमध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात थेट संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे.
२ दिवसापूर्वी नवराष्ट्र बातमीपत्राने मिरा-भाईंदरच्या पूर्व भागातील बीपी रोडवरील पंचवीस वर्षांपूर्वी उभारलेल्या हनुमान मंदिरावर विकासासाठी जागा बळवण्याचा प्रयत्न होत असल्याची बातमी दिली होती. या प्रयत्नाच्या विरोधात स्थानिक हिंदू संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. विकासकार्यांच्या दरम्यान मंदिराची लाईट कापण्यात आली आणि मंदिराच्या दरवाजाला टाळे ठोकण्यात आले.
या घटनांनंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या; त्यांनी टाळे उघडून मंदिरात दररोज रात्री ९ वाजता आरती सुरू केली. स्थानिक सूत्रांनी सांगितले की या विकासामागे स्थानिक आमदारांचा हात असल्याचेही आढळून आले.
बातमी प्रसारित झाल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनाक्रमाची दखल घेतली. परिवहन मंत्री सरनाईक यांनी स्वतः मंदिराची भेट घेऊन आढावा घेतला आणि आश्वासन दिले की “कोणत्याही परिस्थितीत हनुमान मंदिर हटवले जाणार नाही. हे मंदिर गेली २५ वर्षे अस्तित्वात आहे.”