मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. यासह त्यांनी मास्टरस्ट्रोक लगावला आहे. तसेच या निर्णयासह फडणवीस यांनी सर्वांना एकच ‘जोर का झटका’ दिला.
दरम्यान शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सत्तासंघर्षावर भाष्य करत ट्विट केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये खुर्ची तीच पाय तेच फक्त वरचं बूड बदललं,हुजरे तेच मुजरे तेच फक्त समोरचं धूड बदललं, फायली त्याच प्रस्ताव तेच फक्त सहीच पेन बदललं.
बोट तेच शाई तीच फक्त दाबलेला बटन बदललं,माणसं तीच भाषा तीच फक्त आतलं मन बदललं,आरोप तेच प्रकरणं तीच फक्त वातावरण बदललं,पराभूतांनं मन जिंकलं विजेत्यांनं सत्व गमावलं. मतदारांनी लोकशाहीला अन् लोकशाहीनं न्यायपालिकेला पुसलं एवढं महाभारत घडलं त्यात नेमकं कोण जिंकलं ? असा प्रश्न विचारला आहे.
एवढं जे महाभारत घडलं
त्यात नेमकं“कोण” जिंकलं??#MaharashtraPoliticalCrisis pic.twitter.com/EZ64obG7Gi — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 30, 2022