Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack : यासाठी नरेंद्र मोदी जबाबदार…शहा हे अपयशी गृहमंत्री…; विरोधकांनी डागले टीकास्त्र

Pahalgam Terror Attack News Update : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशदवादी हल्ला करण्यात आला. यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 23, 2025 | 01:19 PM
अमरावतीचे 55 पर्यटक पहलगाम येथे सुखरूप

अमरावतीचे 55 पर्यटक पहलगाम येथे सुखरूप

Follow Us
Follow Us:

मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशदवादी हल्ला करण्यात आला. पहलगाम हल्ल्यामध्ये 26 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. . पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटकांवर निशाणा साधण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ ने घेतली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. यामुळे विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे सांगितले. खासदार राऊत यांनी महायुती आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “काल जे झालं त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्राची आहे. हा जो सीझन आहे तो टुरिस्ट सीझन आहे. जेव्हा अमित शहा श्रीनगरमध्ये उतरले तेव्हा अनेक गाड्या त्यांच्यासोबत होत्या. सामान्य माणसांसाठी कोणतीच सुरक्षा व्यवस्था नव्हती. ही लोक डिफेन्समध्ये कात्री करत होते. टेररिझम वाढत आहे ही लोक संसदेत खोट बोलत आहे. काल जे झाला त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आहे. निवडणूक आली की ही लोक मोठी मोठी गोष्ट करतात. नवीन लग्न झालेल्या लोकांची तिथे हत्या करण्यात आली,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अमित शहा श्रीनगरमध्ये गेले तर मेहरबानी केली का?

गृहमंत्री अमित शाह हे श्रीनगरमध्ये दाखल झाले. यावरुन देखील खासदार राऊत यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “अमित शाह हे सेल्युअर गृहमंत्री आहे. एक मिनिटं देखील त्यांनी राहिला नाही पाहिजे. हे लोक राजकारणात व्यस्त आहे. अमित शहा जर श्रीनगरमध्ये गेले तर मेहरबानी केली का? धर्माचे राजकारण चालू आहे ते बुम्रांग होणार. आपले अनेक भाऊ मेले आहेत. ही अमित शहा यांची जबाबदारी नाही का? अमित शहा जी का निषेध करो. आमच्यासारख्या लोकांना कुठे सुरक्षा आहे? काय करणार हे मस्जिद तोडणार का? ही लोक फक्त राजकारण करू शकतात,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

तुम्ही राष्ट्राचे संरक्षण कधी करणार?

“पहलगाम दहशदवादी हल्ल्याबाबत एकनाथ शिंदे काय उत्तर देणार? त्यांच्या लोकांना घेऊन काय सीमेवर जाणार का? देशाच्या इतिहासातले सर्वात अपयशी गृहमंत्रीअमित शहा आहेत. २४ तास तुम्ही सरकार पाडण्यात अडकतात. तुम्ही राष्ट्राचे संरक्षण कधी करणार? याला जबाबदार प्रधानमंत्री आहे. गृहमंत्री जर राजीनामा देणार असतील तर सर्वपक्ष बैठक ठेवा. तुम्ही लोकांनी त्यांना स्वर्गात पाठवले, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.  हे आंदोलन करून कोणाचा निषेध करणार आहे. मंगल प्रभात लोढा कोणाचा निषेध करणार आहे? या दिवसाच्या इतिहासातील सर्वात अपयशी गृहमंत्री असेल तर ते अमित शहा आहेत. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांचा राजीनामा मागितला पाहिजे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Web Title: Mp sanjay raut reaction on pahalgam baisaran terrorist attack jammu kashmir attack news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • Jammu Kashmir Terror Attack
  • Pahalgam Terror Attack
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात
1

Sanjay Raut Criticizes Bandu Jadhav: जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? संजय राऊतांचा खासदार जाधवांवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.