पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्याने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पर्यटकांवर निशाणा साधण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये 26 जणांनी आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ ने घेतली आहे.
दहशदवादी हल्ल्यामध्ये एकूण 26 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये मुंबई, पुणे आणि नागपूरमधील लोकांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. पुण्यातील दोन जिगरी मित्रांचा या दहशदवादी हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे असे या दोघांचे नाव आहे. गणबोटे आणि जगदाळे कुटुंबावर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या नातेवाईकांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कौस्तुभ गणबोटे यांच्या काकूंशी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, आमचा त्यांच्यासोबत काहीही संपर्क झालेला नव्हता. मला तो फिरायला गेला आणि त्याच्यावर हल्ला झाला, असं मला माझ्या मोठ्या सूनेने सांगितलं. घरातील कोणाचाही त्यांच्याशी संपर्क झाला नाही. कौस्तुभच्या बायकोचा फोन आला होता. तो घरी आला होता, तेव्हा मी जाणार आहे फिरायला तिकडे असं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, मी आता नाहीये इकडं तेवढंच बोलला. कौस्तुभ गणबोटे यांची पत्नी सुरक्षित आहे, आम्हाला कोणीच काही सांगत नव्हतं नेमकं काय झालंय. आम्ही नवरा बायको असतो, त्यामुळे घरातील कोणीच आम्हाला सांगत नव्हते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
कौस्तुभ गणबोटेच्या काकू पुढे म्हणाल्या की, कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघे खूप जवळचे मित्र होते. त्या दोघांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आहे. संतोष जगदाळे देखील आम्हाला मुलासारखा होता. घरातील सदस्यासारखा होता, अशा भावना त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.
पहलगाम दहशदवादी हल्ल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांशी काल(दि.22) संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी जगदाळे हे जखमी होते. मात्र नंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जगदाळे यांचे कुटुंबीय म्हणाले की, संतोष जगदाळे, त्यांची पत्नी प्रगती जगदाळे आणि त्यांची मुलगी आसावरी जगदाळे हे तिघे तीन दिवसांपूर्वी काश्मीर फिरायला गेले होते. दोन्ही महिला सुरक्षित आहेत, असे मत जगदाळे कुटुंबियांनी व्यक्त केले आहे.
पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वृत्तानुसार, या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या टीआरएफ म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ ने घेतली आहे. लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्ला खालिद हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. त्याला सैफुल्लाह कसुरी म्हणूनही ओळखले जाते. कसुरी हा भारताचा सर्वात मोठा शत्रू हाफिज सईदचा जवळचा मानला जातो. भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचे नाव आले आहे. त्याला आलिशान गाड्यांचा शौक आहे आणि तो नेहमीच आधुनिक शस्त्रांस्त्रानी सज्ज असलेल्या लोकांसोबत फिरतो.