Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लाडकी बहीण योजनेत 3515 कोटी रुपयांचा अपहार,’ संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, लवकरच कायदेशीर पावले उचलणार?

लाडकी बहीण योजनेतील निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर 3515 कोटी रुपयांच्या अपहाराचा आरोप केला. या प्रकरणी कायदेशीर पावले उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच शरद पवार गटाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अफवा असल्याचे त्यांनी म्हटले.

  • By विवेक
Updated On: Jul 14, 2026 | 02:57 PM
'अमित शहा मुंबईत आले की...'; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

'अमित शहा मुंबईत आले की...'; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Follow Us
Follow Us:
  • लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर संजय राऊतांचा हल्लाबोल
  • शरद पवार सक्षम नेतृत्व; पक्षाबाबतच्या चर्चा ‘अफवा’ असल्याचा दावा
  • जयंत पाटील भाजपसोबत जाणार नाहीत, असा राऊतांचा विश्वास
 

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ई-केवायसी (e-KYC) आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रियेनंतर 92 लाखांहून अधिक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळल्याचा दावा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून राज्य सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

तसेच, लाडकी बहीण योजनेतील पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून संजय राऊत कायदेशीर पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी ‘राज्य सरकारने 92 लाख लोकांची मते विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर करून 3515 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोपदेखील केला.

Union Cabinet Expansion:   एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; अमित शाहांसोबत महत्त्वाच्या बैठकीने राजकीय वातावरण तापले

लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर निशाणा

यावेळी राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारवर जोरदार टीका केली. “92 लाख लोकांची मते विकत घेण्यासाठी सरकारी तिजोरीतील हजारो कोटी रुपये वापरले जात आहेत. आश्रमशाळांना निधी नाही, दिव्यांगांचे अनुदान रखडले आहे, पण मतांसाठी हजारो कोटी खर्च केले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी कायदेशीर पाऊल उचलण्याचे संकेतही त्यांनी दिले.

‘शरद पवार गटातील 10 पैकी 9 आमदार अस्वस्थ, भाजपसोबत जाण्याच्या तयारीत’

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष आहे. त्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आहेत. शिंदे गट आणि अजित पवार गट हे अमित शाह यांचे पक्ष आहेत. त्यांच्यात काय सुरू आहे, यावर आम्ही का बोलावे?”

ते पुढे म्हणाले की, शरद पवार हे महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते आहेत. पक्षातील घडामोडींवर लक्ष असणे स्वाभाविक आहे. नुकतीच सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या या अफवा असल्याचे सांगितल्याचा दावा राऊत यांनी केला.

Maharashtra Politics: अजित पवारांच्या पक्षापेक्षा थेट भाजप…! शरद पवारांची राष्ट्रवादी NDA च्या दिशेने? पडद्यामागे मोठ्या हालचाली

ते म्हणाले, “सगळेच पक्ष यावेळी अडचणींतुन प्रवास करतायत. शिवसेनेपुढे, शरद पवार साहेब, सुनेत्रा पवार जो गट सांभाळतायेत ते सुद्धा अडचणीत आहे. ज्या अनाकडे प्रचंड बहुमत आहे, ते अडचणीत नाहीत असं नाही. आम्ही आमच्या पक्षपुरता बोलू. आमचा मार्ग कसा व्यवस्थित होईल यावर काम करू. शरद पवार महत्वाचे नेते आहेत. त्यांच्या पक्षाच्या अडचणी दूर करण्यासाठी ते समर्थ आहेत. अडचणी बाह्य शक्तींकडून निर्माण केल्या जात आहेत. या बाह्य शक्ती म्हणजे मोदी आणि शाह आहेत.”

दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील हे शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचे नेते असून ते वेगळा राजकीय मार्ग स्वीकारतील, असे वाटत नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

Web Title: Sanjay raut slams maharashtra government over ladki bahin yojna

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government
  • sanjay raut
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
1

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन
2

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात
3

‘सत्तेतील मंत्र्यांचेच सरकार ऐकत नसेल तर…’; खासदार संजय राऊत यांचा घणाघात

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
4

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.