Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “आता मंत्रालयात सुद्धा अंडरवर्ल्ड सुरू…”; खासदार संजय राऊतांचा घणाघात

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच मस्साजोग गावावरुन महायुतीवर निशाणा साधला आहे,

  • By प्रीति माने
Updated On: Feb 18, 2025 | 11:22 AM
आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार

आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. डिसेंबरमध्ये झालेल्या या हत्येमुळे राज्याचे राजकारण तापले आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आहे. या सांत्वनपर भेटीमध्ये खासदार सुळेंबरोबरच आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार बजरंग सोनावणे उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बीडवरील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मस्साजोग ग्रामस्थांचा आवाज कोणीही ऐकला नाही हे सरकार मूकबधिर झाले आहे या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना कोणाला तरी वाचवायचे आहे यांचा तो जुना मित्रपरिवार आहे. भाजप युवा मोर्चा मधला त्यांच्या सहकार्याला वाचवायचे आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा ताबडतोब घ्यायला पाहिजे. आमच्या काळामध्ये मनोहर जोशींचा सरकार असताना नैतिकतेच्या मुद्द्यावर तीन मंत्र्यांचा राजीनामा घेतला. नैतिकतेच्या मुद्द्यावर आम्ही संजय राठोड यांचा राजीनामा घेतलेला ते आता त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महायुतीच्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या आमदार व खासदार यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. यावरुन खासदार राऊत यांनी टोला लगावला आहे. खासदार राऊत म्हणाले की, ज्यांनी या राज्यात वाय झेड करून टाकली आहे हे वेड्यांचे सरकार आहे. हे मंत्रालयात वेड्यांची जत्रा आहे. मंत्रालयात गोंधळ आहे. राज्यात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहेत गृहनिर्माण खात्यात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. म्हाडा मध्ये अधिकाऱ्याची नेमणूक संबंधित मंत्र्यांना रोकडे देऊन केली जाते. लवकरच कोणत्या प्रकल्पासाठी किती पैसे दिले गेले याची माहिती मी उघड करेन, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात त्यांच्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलं आहे फडणवीस यांचे आदेश पाळू नका अशा प्रकारचं आवाहन एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये निर्माण झालं होतं. आता मंत्रालयात सुद्धा अंडरवर्ल्ड सुरू आहे समांतर सरकार सुरू आहे प्रति सरकार सुरू असेल तर मंत्रालयात राजकीय अराजक निर्माण झाले आहे. देवेंद्र फडणवीस हे मोडून काढणार नसतील तर हे राज्य अराजकतेच्या खालीच ढकललं जाईल. 56 ते 57 आमदार ईव्हीएम ताकदीवर निवडून आले भाजपने ते आता सरकारला आव्हान देत आहेत, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Web Title: Mp sanjay raut target eknath shinde for reduction in security mp and mla

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 11:22 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mahayuti Government
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Thane Election:  शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!
1

Thane Election: शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल
2

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

Ambarnath News: अंबरनाथमध्ये भाजपच्या कमळावर धनुष्याचा वार; शिंदेंची शिवसेना–राष्ट्रवादी सत्ता स्थापणार
3

Ambarnath News: अंबरनाथमध्ये भाजपच्या कमळावर धनुष्याचा वार; शिंदेंची शिवसेना–राष्ट्रवादी सत्ता स्थापणार

Maharashtra Politics: “एकनाथ शिंदेजी तुम्ही थेट ‘AIMIM’ वासी…”; अंबादास दानवेंची सडकून टीका
4

Maharashtra Politics: “एकनाथ शिंदेजी तुम्ही थेट ‘AIMIM’ वासी…”; अंबादास दानवेंची सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.