रोहित पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांसाठी जोरदार प्रचार केला (फोटो - सोशल मीडिया)
Baramati by election : बारामती : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुक होत आहे. अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याचा आणि पक्षाचा कारभार हाती घेतला आहे. बारामतीमध्ये पोटनिवडणूकीसाठी जोरदार प्रचार केला जात आहे. सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवार गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे देखील प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. मात्र रोहित पवारांनी ते सुनेत्रा पवारांच्या प्रचार करत असून महायुतीचा करत नसल्याचे म्हणत भूमिका स्पष्ट केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामती पोटनिवडणुकीतील प्रचाराबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ते फक्त सुनेत्रा काकींसाठी प्रचार करत असून प्रचार महायुतीसाठी नाही असे म्हटले आहे. त्याचबरोबर रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “भाजपचे नेते सुनेत्रा काकींचा प्रचार करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. परंतु असं करण्यामागे त्यांचा उद्देश वेगळा काय आहे हे माहीत नाही. पण जर तसं असेल तर त्यांनी बारामतीकरांना ओळखलं नाही,” असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : : छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४१.४ अंशांवर! प्रशासनाकडून ‘हीट वेव्ह’चा इशारा; आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’ मोडवर
सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी रोहित पवारांनी भेटीगाठी वाढवल्या असून कोपरसभा आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. रोहित पवार म्हणाले की, “खरंतर बारामती पोटनिवडणुक ही बिनविरोध झाली पाहिजे होती. मात्र निवडणुकीमध्ये जे 22 ते 23 अपक्ष उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत. ते राहिला नको होते. अजित पवार यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून जो उमेदवारीचा आकडा 60 होता तो 22 ते 23 वर आणला,” असे मत रोहित पवारांनी व्यक्त केले.
करुणा मुंडेंचा अर्ज हा भाजपचा डाव?
पुढे ते म्हणाले की, “अपक्ष उमेदवारांच्या यादीमध्ये एक नाव करुणा मुंडे यांचे आहे. भाजपच्या एखाद्या बड्या नेत्याने त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी उमेदवारी अर्ज ठेवला नसता. याच्या मागचं कारण असं की महाविकास आघाडीचे सरकार गेलं आणि त्यावेळी आम्ही सर्व आमदारांनी सह्या करून अजित पवार यांना विरोधी पक्ष नेता म्हणून निवडलं होतं. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वात धनंजय मुंडे हे भाजपवर जोरदार टीका करत होते. ज्या अधिवेशनात धनंजय मुंडे भाजपा विरुद्ध बोलत होते. त्याच अधिवेशनात एका भाजपच्या मोठ्या नेत्याने करुणा मुंडे यांना आमंत्रित केलं आणि त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली. आणि त्या पत्रकारांशी बोलल्या आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून धनंजय मुंडे यांनी भाजपावर टीका करणे सोडून दिलं. त्यामुळे मला वाटतं की भाजपच्या कोणत्याही नेत्याने करुणा मुंडे यांना सांगितलं असतं तर त्यांनी तो फॉर्म ठेवला नसता,” अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे रोहित पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला.
हे देखील वाचा : “जनाची नाही तर मनाची तरी ठेवा” ; लोकदरबारात MMRDA अधिकाऱ्यांवर मंत्री प्रताप सरनाईकांचा संताप
पुराज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही रोहित पवार यांना डिवचलं आहे. रोहित पवार यांनी ‘बारामतीत बाहेरून येऊन समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील,’असा टोला लगावला.






