Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती…

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे महायुती सरकारवरील दबाव वाढला आहे. नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीमंडळात बैठक पार पडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 06, 2026 | 07:24 AM
MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती...

MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांची गच्छंती अटळ; मुख्यमंत्र्यांचे थेट राज्यपालांना पत्र, आता चौकशी समिती...

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) उमेदवारांचे आंदोलन लक्षात घेता आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना पत्र लिहून संविधानाच्या कलम ३१७ नुसार एमपीएससी आयोगाचे माजी व सध्याचे अध्यक्ष आणि सदस्यांवर कारवाई करण्यासाठी एका चौकशी समितीचे गठन करण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्याची शिफारस केली असून, पुढील कारवाईसाठी तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले. तज्ज्ञांच्या मते, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या शिफारशीनंतर आता एमपीएससीचे विद्यमान अध्यक्ष विवेक भिमनवार यांचे पद जाणे निश्चित मानले जात आहे. एमपीएससीच्या परीक्षामधील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या प्रकरणांवरून पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. विशेषतः अलीकडेच अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत असलेल्या ‘ड्रग इन्स्पेक्टर’ पदाचा पेपर फुटल्याने विद्याथ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे महायुती सरकारवरील दबाव वाढला आहे. नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीमंडळात बैठक पार पडली. त्या बैठकीत एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीसंदर्भात आश्वासन देण्यात आले. त्यानंतर हरपाळकर यांना सचिवपदावरून कार्यमुक्त करण्यात आले. मात्र, आता विद्यार्थी एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. याच कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करत राज्यपालांना हे पत्र लिहिले आहे.

पवारांनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यानी नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधत एमपीएससी विद्याथ्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून त्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आवाहन केले, गरज भासल्यास आणि विद्यार्थी प्रतिनिधी तयार असल्यास, हा तिढा सोडवण्यासाठी व न्याय्य मार्ग काढण्यासाठी आपण स्वतः योगदान देण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रोहित पवार यांनीही उघडली आघाडी

पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालीही एमपीएससी विद्याथ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, यातही आता अनेक गट पडले आहेत. सध्या पुण्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी विरोध प्रदर्शन सुरू आहे.

MPSC Protest : ‘एका परीक्षेमुळे आयुष्य…’; आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीत सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दीपके भावूक

Web Title: Mpsc chairman vivek bhimanwar to be removed from his post soon nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 07:19 AM

Topics:  

  • Education Sector
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण
1

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
2

‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात
3

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
4

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.