Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

Shiv Sena Candidates: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने सक्रिय सहभाग घेत उमेदवार मैदानात उतरवले आहेत. संगमनेर तालुक्यातून तीन आणि शेवगावमधून एक उमेदवार रिंगणात उतरल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 05, 2026 | 05:53 PM
जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

Follow Us
Follow Us:
  • जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेची एन्ट्री
  • संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन तर शेवगावमधून एक उमेदवार मैदानात
  • आ.लंघे, आ खताळ, लोखंडे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल
 

पोपट पिटेकर, अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता रंगू लागली आहे. विविध राजकीय पक्ष आणि गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला आहे. संगमनेर तालुक्यातून तीन, तर शेवगावमधून एक उमेदवार मैदानात उतरवण्यात आल्याने जिल्हा बँकेतील राजकीय चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Shiv Sena Candidates)

MPSC Protest : रोहित पवारांचं आंदोलन ‘पॉलिटिकल स्पॉन्सर्ड’? 200 ते 250 गाड्यांमधून कार्यकर्ते आणले’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांनी पडद्यामागून हालचाली करत, शिवसेनेला विश्वासात न घेताच ही निवडणूक बिनविरोध उरकण्याचा घाट घातला होता. मात्र, या प्रस्थापित राजकीय गणितांना सुरुंग लावत शिवसेनेच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी स्वबळावर आपली ताकद दाखवण्याचा आक्रमक निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील जुने मातब्बर आणि सत्ताधारी नेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

​संगमनेर तालुक्यातून तीन प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल

जिल्हा बँकेत सर्वसामान्य शेतकरी आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने संगमनेर तालुक्यातून आपले तीन खंदे शिलेदार रिंगणात उतरवले आहेत. आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले उमेदवारी अर्ज मोठ्या शक्तीप्रदर्शनाने दाखल केले. ​या अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी संगमनेर, अकोले, श्रीरामपूर तसेच शेवगाव तालुक्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि हजारो शिवसैनिक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

घराणेशाही आणि मक्तेदारीविरुद्ध बंड: अरुण मुंडे ‘एनटी डी’ मधून मैदानात

जिल्हा बँकेच्या रिंगणात प्रस्थापित राजकारण्यांवर जोरदार हल्लाबोल करत शिवसेनेचे खंदे नेते अरुण मुंडे यांनी ‘एन टी डी’ मतदारसंघातून शिवसेना पॅनेलच्या वतीने आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ​गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या गावातील विकास सोसायटी अतिशय पारदर्शक आणि यशस्वीपणे चालवण्याचा दांडगा अनुभव अरुण मुंडे यांच्या पाठीशी आहे. जिल्हा बँक ही केवळ काही मोजक्या घराण्यांची वा जहागीरदारांची मालमत्ता नसून ती सर्वसामान्य शेतकरी आणि सभासदांची आहे..असा घणाघाती आरोप करत मुंडे यांनी स्थानिक सत्ताधाऱ्यांविरुद्ध एल्गार पुकारला आहे. सर्वसामान्य शेतकरी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचा बुलंद आवाज बनून ते या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

सहकार क्षेत्रातील चुरस वाढली; राजकीय गणिते बदलणार?

​उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेने जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून आपले अधिकृत उमेदवार मैदानात उतरवण्याची रणनीती आखली आहे. शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता मोठी चुरस निर्माण झाली असून आगामी काळात संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे

CJP Leaders Claim Arrest Plan: अभिजीत, आशुतोष, सौरवसह CJP नेत्यांना अटक करण्याचे प्लॅनिंग; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Web Title: Ahilyanagar district central cooperative bank election shiv sena fields candidates from sangamner shevgaon sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Maharashtra Politics
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
1

‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात
2

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त
3

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने
4

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.