Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC परीक्षेत पुन्हा गोंधळाचा आरोप; राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक परीक्षेचा ‘मार्किंग पॅटर्न’ फुटल्याचा दावा

MPSCच्या राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक (गट-क) परीक्षेच्या मार्किंग पॅटर्नसह पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही उमेदवारांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून नवी मुंबई पोलिसांच्या अहवालावरून प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 27, 2026 | 10:07 PM
राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक परीक्षेचा ‘मार्किंग पॅटर्न’ फुटल्याचा दावा

राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक परीक्षेचा ‘मार्किंग पॅटर्न’ फुटल्याचा दावा

Follow Us
Follow Us:
  • राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक परीक्षेचा ‘मार्किंग पॅटर्न’ फुटल्याचा रोहित पवारांचा आरोप.
  • परीक्षेच्या आठवडाभर आधी प्रश्नांचे फोटो व्हॉट्सॲप ग्रुपवर फिरल्याचा याचिकेत दावा.
  • नवी मुंबई पोलिसांचा गोपनीय अहवाल सादर न झाल्याने 29 ऑगस्टला अंतिम सुनावणी.
 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये कथित गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. औषध निरीक्षकपदाच्या पेपरफुटी प्रकरणानंतर आता राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक (गट-क) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा ‘मार्किंग पॅटर्न’ फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत ठराविक उमेदवारांना फायदा मिळाल्याचा आणि आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.

MPSCने 23 सप्टेंबर 2025 रोजी राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेतली होती. या परीक्षेतील मार्किंग पॅटर्नबाबत काही उमेदवारांनी आक्षेप घेतला असून परीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा करण्यात आला आहे.

परीक्षेपूर्वीच प्रश्न व्हॉट्सॲपवर फिरल्याचा दावा

या प्रकरणी काही उमेदवारांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. याचिकेत करण्यात आलेल्या दाव्यानुसार, परीक्षेच्या सुमारे आठवडाभर आधी दोन पेपरमधील प्रश्नांचे फोटो काही व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित झाले होते. विशेष म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेत आलेले अनेक प्रश्न या फोटोमधील प्रश्नांशी तंतोतंत जुळल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, भांडुप स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अर्बन डिझायनरची मदत

ही माहिती आधीच लीक झाल्याने संबंधित उमेदवारांना अनुचित फायदा मिळाला आणि समान संधीच्या तत्त्वाचा भंग झाला, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण परीक्षा आणि निकाल रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या अहवालाकडे लक्ष

या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केल्याची माहिती आहे. तपासानंतर पोलिसांनी आपला अहवाल MPSCकडे सादर केल्याचे सांगितले जाते. या गोपनीय अहवालाची प्रत न्यायालयात सादर करण्याचे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते.

Lek Ladki Yojana: मुंबईतील 3 हजार 563 लाभार्थींना मिळणार लाभ; अंतिम लाभ मिळण्यासाठी काय आहे अट?

मात्र 27 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीतही हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणातील संशय अधिक गडद झाला असून आता 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंतिम सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीत MPSCचे सहसचिव आणि इतर काही जण दोषी आढळल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्याने केला जात आहे. त्यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आल्याचेही सांगितले जाते. मात्र या आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहेत.

Web Title: Mpsc state excise sub inspector exam marking pattern paper leak allegation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 10:07 PM

Topics:  

  • MPSC
  • MPSC Exam
  • rohit pawar

संबंधित बातम्या

MPSC पेपरफुटीवरून रोहित पवार आक्रमक; FIR सार्वजनिक करण्यासह आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी
1

MPSC पेपरफुटीवरून रोहित पवार आक्रमक; FIR सार्वजनिक करण्यासह आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

MPSC च्या पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; थेट अवर सचिवालाच केली अटक
2

MPSC च्या पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; थेट अवर सचिवालाच केली अटक

MPSC Paper Leak: परीक्षा पुन्हा होणार! ६ आरोपी क्राइम ब्रँचच्या जाळ्यात; उमेदवारांना भरावा लागणार नाही अतिरिक्त शुल्क
3

MPSC Paper Leak: परीक्षा पुन्हा होणार! ६ आरोपी क्राइम ब्रँचच्या जाळ्यात; उमेदवारांना भरावा लागणार नाही अतिरिक्त शुल्क

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक
4

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.