स्वारगेट व शिवाजीनगर बस डेपो सुधारण्याबाबत एमएसआरटीसी आणि महामेट्रोमध्ये करार झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुण्यामध्ये महत्त्वाचे बस स्थानक असलेल्या शिवाजीनगर येथे मेट्रोचे काम सुरु झाले होते. मात्र बस स्थानक आणि मेट्रो प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो)मध्ये बसस्थानच्या पुनर्बांधणीवरुन मतभेद झाले होते. मात्र यामुळे काम रखडले गेले आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत आता पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करुन मार्ग काढला आहे.
शिवाजीनगर येथील एसटी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बुधवारी आढावा बैठक पार पडली. यावेळी पुण्यातील खासदार, आमदारांसह सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मेट्रो आणि बस दोन्ही विभागांमध्ये समेट घडवून आणण्यात यश आले आहे. शिवाजीनगर येथील जुन्या एसटी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. , या प्रकल्पासाठी ‘एमएसआरटीसी’ आणि महामेट्रो यांच्यात येत्या आठवडाभरात करार करण्यात येणार आहे. ६०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन मे महिन्यात होणार असून, तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. त्यामुळे शिवाजीनगरच्या बस स्थानकच्या पुर्नंबांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवाजीनगर (पुणे)एस .टी बस स्थानकाच्या धर्तीवर स्वारगेट बस डे पो व मेट्रो स्थानक विकसित करणार करण्यात येणार आहे. याबाबत परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाजीनगर येथील बस स्थानक विकसित करण्यासाठी महा मेट्रो व राज्य परिवहन महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. याच त्या अनुषंगाने हे बस स्थानक विकसित होत आहे याच धर्तीवर स्वारगेट येथील बस स्थानक व मेट्रो स्थानक ही विकसित करावे अशा सुचना राज्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केल्या याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे अजित पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले
बाधा, वापरा, हस्तांतरण करा यानुसार शिवाजीनगर (पुणे) बसस्थानक विकसित करण्यात आले आहे याच अनुषंगाने आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी हे काम तात्काळ पुर्ण करण्याबाबत सुचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले . या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नवि विभाग अ.मु.स. असिम गुप्ता ,पुणे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर तसेच राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर हे उपस्थित होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या बैठकीमध्ये राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी शिवाजीनगर बस स्थानकाच्या धर्तीवर स्वारगेट येथील बस स्थानक व मेट्रो स्थानक विकसित करण्याबाबत सूचना केल्या त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्वतः मान्यता दिली व संबंधितांना आठ दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले ज्याप्रमाणे शिवाजीनगर येथील बस स्थानकात दोन तळघर चारचाकी वाहन बस स्थानकाचा तळमजला व व्यावसायिक साठी शॉपिंग मॉल आहेत त्याचप्रमाणे स्वारगेट येथील बस स्थानकात अशा प्रकारच्या सुविधा असाव्यात अशा सूचना यावेळी राज्याचे परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले पुणे महा मेट्रो व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ दोघांच्या समन्वयातून ही सुंदर व सर्व सोयींनी युक्त अशी इमारत लवकरच उभी राहील अशी ग्वाही यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.