Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार; दादर, बोरिवली अन् स्वारगेटहून ST बससेवा

MSRTC News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी एसटी महामंडळाकडून 7 ऑक्टोबरपासून दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवा सुरू करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ होईल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 06, 2026 | 05:37 PM
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार; दादर, बोरिवली अन् स्वारगेटहून ST बससेवा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढणार; दादर, बोरिवली अन् स्वारगेटहून ST बससेवा

Follow Us
Follow Us:
  • नवी मुंबई विमानतळासाठी STची खास सेवा
  • 7 ऑक्टोबरपासून दादरहून धावणार बस
  • दादर, बोरिवली अन् स्वारगेटहून ST बससेवा
MSRTC News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवा ७ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते या विमानतळ बससेवेचा प्रारंभ होणार आहे. (MSRTC News)

तीन मार्गांवरून बससेवा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. विमानतळ उभारणीइतकेच महत्त्वाचे म्हणजे त्याला मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोकण तसेच राज्याच्या विविध भागांशी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जोडणे होय. या पार्श्वभूमीवर एसटीची दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवा प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याबरोबरच बोरिवली ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्वारगेट ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी बससेवा देखील सुरू होत आहे.

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून काँग्रेसने सरकारला घेरलं, आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा पेटला!

विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम

“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी एसटीची विमानतळ बससेवा महत्त्वपूर्ण ठरेल. विमानतळाला एसटीच्या व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळ्याशी जोडल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, विद्यार्थी तसेच विमानप्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह , प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल,” असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

प्रवाशांसाठी मोठी सुविधा

एसटीची ‘लालपरी’ राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. या व्यापक जाळ्याचा उपयोग करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत प्रवाशांना सहज आणि सुलभपणे पोहोचता यावे, यासाठी एसटी महामंडळाकडून टप्प्याटप्प्याने आवश्यक बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दादर हे मुंबईतील प्रमुख वाहतूक केंद्र असल्याने येथून विमानतळासाठी सुरू होणारी थेट बससेवा प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील विविध भागांतून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा करण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. विमानतळापर्यंतची अखंड आणि सहज सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी ही आधुनिक वाहतूक व्यवस्थेची खरी ओळख आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एसटीचे व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळे यांचा समन्वय महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील महत्त्वाचा दुवा ठरणार असून, प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी, दर्जेदार विमानतळ बससेवा देण्याचा एसटी महामंडळाचा संकल्प असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Vegetable Market Update : नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट मध्ये भाजीपाल्यांची आवक घटल्यानं भाजीपाला महाग, ग्राहकांच्या खिशाला झळ

Web Title: Msrtc dadar navi mumbai international airport bus service starts october 7 borivali swargate routes sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • international airport
  • Navi Mumbai
  • st bus

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका
1

Navi Mumbai News: ६ ऑक्टोबरला नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या कोणत्या भागांना फटका

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी
2

Navi Mumbai News: वाशी एपीएमसीतील केळी पिकवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; नियमांचे उल्लंघन झाल्याची चौकशी

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
3

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार
4

Navi Mumbai News: नवी मुंबई सायन्स पार्कच्या कामाला वेग; १०५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी, १३५ वैज्ञानिक मॉडेल्स उभारणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.