मध्य रेल्वेकडून 63 तासांचा ब्लॉक घेण्यात येत आहे. आज मेगाब्लॉकचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे मुंबईच नाहीतर मुंबईबाहेर जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांवर ही याचा मोठा परिणाम झाला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरील एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 10 आणि 11 ची लांबी वाढवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी सीएसएमटी स्थानकातून डाऊन दिशेची वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. यामुळे दादर स्थानकातून गाड्या सोडण्यात येणार आहे. आज (1 जून) 37 लांब पल्ल्यांच्या तर 534 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या परळ आणि भायखळ्यापर्यंतच धावत आहेत, त्यामुळे ठाणे स्थानकावर लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने येत आहेत. तर दुसरीकडे सीएसएमटी ते भायखळा या मार्गापर्यंत लोकल असणार. तसेच हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा रोड मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेचा उद्याचा ब्लॉक रद्द
मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून पश्चिम रेल्वेकडू उद्याचा म्हणजे रविवार (2 जून) चा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून या मार्गावर 16 ऐवजी 24 डब्यांच्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबू शकतील. यासाठी इंटरलॉकिंग, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर यासारख्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येत आहे.
1 जूनला या अप ट्रेन रद्द
1) 11010 : पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
२) 12124 : पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्सप्रेस
3) 12110: मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस
४) 12126 : पुणे-सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस
५) 20705 : जालना-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस
६) 11012 : धुळे-सीएसएमटी एक्सप्रेस
7) 11008 : पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस
८) 12128: पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस
९) 17618 : नांदेड-सीएसएमटी तपोवन एक्सप्रेस
१०) 22226 : सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस
11) 22230 : मडगाव-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस
१२) 22120 : मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस
13) 12702 : हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्स्प्रेस
१४) 17412 : कोल्हापूर-सीएसएमटी महालक्ष्मी एक्सप्रेस
१५) 171611: नांदेड-सीएसएमटी राज्यराणी एक्सप्रेस
1 जनू रोजी या डाऊन गाड्या रद्द
१) 17617 : सीएसएमटी-नांदेड तपोवन एक्सप्रेस
२)22119: सीएसएमटी – मडगाव तेजस एक्सप्रेस
३) 12127 : सीएसएमटी-पुणे प्रगती एक्सप्रेस
4) 11007 : सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्सप्रेस
5) 11011: सीएसएमटी-धुळे एक्स्प्रेस
6) 20706 : सीएसएमटी-जालना वंदे भारत एक्सप्रेस
७) 22225 : सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस
८) 12125 : सीएसएमटी-पुणे प्रगती एक्सप्रेस
९) 12123 : सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस
10) 11009 : सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस
११) 12109 : सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्सप्रेस
१२) 17612 : सीएसएमटी-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस
13) 12111 : सीएसएमटी-अमरावती एक्सप्रेस
14) 12289 : सीएसएमटी-नागपूर दुरांतो एक्सप्रेस
१५) 17411 : सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
16) 12701 : सीएसएमटी-हैदराबाद हुसेन सागर एक्स्प्रेस