Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Metro 9 : काशिगाव मेट्रो स्थानक सज्ज, लवकरच मिरा-भाईंदरकरांचा प्रवास होणार आरामदायी

मिरा-भाईंदरकर ज्या मेट्रो सेवेसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत होते, त्या दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेतील महत्त्वाचे काशिगाव मेट्रो स्थानक आता वापरासाठी जवळपास पूर्णपणे सज्ज झाले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 21, 2026 | 02:24 PM
Mumbai Metro 9 : काशिगाव मेट्रो स्थानक सज्ज, लवकरच मिरा-भाईंदरकरांचा प्रवास होणार आरामदायी
Follow Us
Follow Us:
  • काशिगाव मेट्रो स्थानक सज्ज,
  • लवकरच मिरा-भाईंदरकरांचा प्रवास होणार आरामदायी
भाईंदर/ विजय काते : मिरा-भाईंदरकर ज्या मेट्रो सेवेसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहत होते, त्या दहिसर–मिरा भाईंदर मेट्रो मार्गिकेतील महत्त्वाचे काशिगाव मेट्रो स्थानक आता वापरासाठी जवळपास पूर्णपणे सज्ज झाले आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज या स्थानकाची पाहणी करून कामांचा आढावा घेतला.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या माध्यमातून सुमारे सात वर्षांपूर्वी या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले होते. दहिसर ते काशिगाव आणि काशिगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान अशा दोन टप्प्यांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीच मेट्रोची यशस्वी चाचणी पूर्ण झाली असून, लवकरच सेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

मात्र, काशिगाव स्थानकाचे काम अपूर्ण असल्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी काही काळ प्रलंबित राहिली. त्यानंतर प्रशासनाने अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करून कामाला गती दिली. सध्या स्थानकाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून साफसफाई, तांत्रिक यंत्रणांची चाचणी, साहित्य पडताळणी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक यांसारखी कामे सुरू आहेत.स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ स्तरावरून अंतिम परवानगी मिळाल्यानंतर काशिगाव मेट्रो स्थानक प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरकरांना मुंबईकडे जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे.

KDMC News : अनधिकृत नळजोडण्यांमुळे पाणी मिळेना; MIDCचा पाणी बिलावर ‘डिपॉझिट’ धक्का!

दरम्यान, काशिगाव मेट्रो स्थानक अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रणा, विद्युत आणि पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यात आली आहे. तसेच दोन प्रशस्त तिकीट काउंटर, ग्राहक तक्रार निवारण केंद्र, डिजिटल तिकीट प्रणाली, चार धावते जिने (एस्केलेटर), लिफ्ट, आपत्कालीन गजर प्रणाली आणि आकर्षक प्रकाशयोजना यांचा समावेश करण्यात आला आहे.एकूणच, काशिगाव मेट्रो स्थानकाच्या पूर्णत्वामुळे मिरा-भाईंदर शहराच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून, स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात महत्त्वपूर्ण बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाणे-मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाला मिळणार ‘आनंद दिघे’ नाव; पालिकेचा ठराव एकमताने मंजूर

Web Title: Mumbai metro 9 kashigaon metro station ready soon mira bhayanderkar travel will be comfortable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन
1

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
2

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार
3

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.