मुंबई-नाशिक महामार्ग : मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटामध्ये झिरो पॉइंट जवळ वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने कारने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करून बाहेर पडला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटी, इगतपुरी नगरपरिषद अग्निशमन दल, टोल प्लाझाचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग पोलीस घोटीच्या कर्मचाऱ्यांनी जुन्या घाटातील वाहतूक काही काळासाठी बंद केली आहे.