Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Police Salary Scam: पोलीस दलातील ६.५ कोटींच्या वेतन घोटाळ्यात ५ जणांवर गुन्हा; मंत्रालयातील अधिकारी रडारवर

Mumbai Police: या गैरव्यवहारातील संबंधित बँक खात्यांतील व्यवहार, वेतनाची रक्कम नेमकी कोणाकडे पोहोचली, बनावट नोंदी कोणी तयार केल्या आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता याचा तपास यंत्रणाकडून तपास केला जात आहे,

  • By anuradha sagar
Updated On: Aug 04, 2026 | 11:18 AM
Mumbai Police, Crime News, Mumbai News, Fraud,

Mumbai Police, Crime News, Mumbai News, Fraud,

Follow Us
Follow Us:
  • पोलीस दलात तब्बल ६.५ कोटी रुपयांचा वेतन घोटाळा
  • मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा अपहार
  • समतानगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
 

Mumbai Police Salary Scam:  मुंबई पोलिस दलातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलिस दलात बनावट पोलिसांच्या नावे तब्बल ६.५ कोटींचा वेतन घोटाळा समोर आला आहे. पोलिस दलात कार्यरत नसलेल्या बनावट व्यक्तींना पोलिस कर्मचारी दाखवून त्यांच्या नावे पगाराची रक्कम लाटण्यात आली. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती जुन्या ‘सेवार्थ’ वेतन प्रणालीतून नवीन प्रणालीमध्ये ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रक्रियेदरम्यान हा सगळा हा संशयास्पद प्रकार लक्षात आला. यानंतर तातडीने विशेष ऑडिट करण्यात आले. या ऑडिटदरम्यान, २०१९ आणि २०२० या दोन वर्षांतील काही महिन्यांच्या पगाराच्या रकमांमध्ये मोठी तफावत असल्याचे आढळून आले. ज्यांच्या खात्यात पगाराचे कोट्यवधी रुपये जमा झाले होते. त्यांच्या नावाची तपासणी केली असता त्यातील कोणीही पोलिस दलात कार्यरत असल्याचे सिद्ध झाले नाही.  (Fraud)

मोठी बातमी ! EPFO ने जुना नियम बदलला; आता 25 हजारापर्यंतच्या मूळ वेतनावर मिळणार पेन्शन?

वेतन वितरण प्रक्रियेतील त्रुटींचा गैरफायदा

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस दलाच्या प्रत्येक प्रादेशिक कार्यालयातून कर्मचाऱ्यांचे वेतन तयार केले जाते. कर्मचाऱ्यांची उपस्थिती, कामाचे दिवस आणि थकबाकी यांचा तपशील तयार करून तो लेखा विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला जातो. याच प्रक्रियेतील त्रुटींचा फायदा घेत काही अधिकाऱ्यांनी पोलीस दलात नसलेल्या ८ ते १० व्यक्तींची नावे वेतन यादीत समाविष्ट केल्याचा आरोप आहे.

बोगस नावांवरून लाखो रुपयांचा पगार

पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, काही व्यक्तींना पोलीस कर्मचारी असल्याचे भासवून त्यांच्या नावावर दरमहा वेतन काढले जात होते. रामदास भोगले, सुधाकर कदम, सरजू यादव, भगवत भोसले, गुणाजी खावकर, महादेव हलदणकर, राजेंद्र सोनार, उत्तम थोरात, सूर्यकांत पाटील आणि पांडुरंग कदम या नावांवरून वेतन वितरित करण्यात आल्याचे ऑडिटमध्ये समोर आले. त्यानंतर या व्यक्ती प्रत्यक्षात कोण आहेत, त्यांची ओळख काय आहे आणि त्यांच्या बँक खात्यांवर कोणाचा ताबा होता, याचाही आता पोलिसांकडू तपास सुरू आहे.

Maharashtra Breaking News Live Updates Today: लिव्ह-इन पार्टनरलाही हुंडा छळ कायदा लागू

पाच अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

या प्रकरणात सरकारची फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर करणे, पुरावे नष्ट करणे, कट रचणे यांसारख्या गंभीर आरोपांखाली पाच तत्कालीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण, तसेच प्रमुख लिपिक अजय राठोड आणि वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम यांचा समावेश आहे.

आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू

या गैरव्यवहारातील संबंधित बँक खात्यांतील व्यवहार, वेतनाची रक्कम नेमकी कोणाकडे पोहोचली, बनावट नोंदी कोणी तयार केल्या आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता याचा तपास यंत्रणाकडून तपास केला जात आहे, तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर मुंबई पोलीस दलातील वेतन वितरण प्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भविष्यात अशा प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि डिजिटल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Mumbai news mumbai police 6 5 crore fake employee salary scam samata nagar fir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • crime news
  • fraud
  • Mumbai News
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Suicide : प्राध्यापकाविरोधात FIR दाखल; वडिलांचा तीन महिन्यांपासून जातीय छळ केल्याचा आरोप
1

IIT Bombay Student Suicide : प्राध्यापकाविरोधात FIR दाखल; वडिलांचा तीन महिन्यांपासून जातीय छळ केल्याचा आरोप

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा
3

वाहतूक दंडाची लिंक पाठवून एकाची फसवणूक; तब्बल पावणेतीन लाखांना घातला गंडा

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले
4

एपीके फाईल अन् ८.५९ लाख झाले गायब; लिंकवर कार्डची माहिती भरताच पैसे काढून घेतले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.