Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला

Lalbaugcha Raja 2026: देशातील अत्यंत लोकप्रिय अशा गणपती बाप्पा म्हणजे लालबागचा राजा...या बाप्पाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. मात्र मुंबईत आलेल्या एका 25 वर्षीय तरुणाची दर्शनाची आस अखेरची ठर ली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 19, 2026 | 03:42 PM
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्...; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला (फोटो सौजन्य-ChatGPT)

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्...; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या २५ वर्षीय भाविकाचा मृत्यू
  • जळगावच्या जयदीपवर काळाचा घाला
  • लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत तरुणाला श्वास घेण्यास त्रास
Lalbaugcha Raja 2026: सध्या गणेशोत्सवाच्या काळात राज्यभर भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहेत. मुंबईतील गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नवसाला पावणारा राजा म्हणजे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मुंबईत दाखल होत आहे. मात्र याच दर्शनासाठी जळगावहून मुंबईत आलेल्या एका 25 वर्षीय तरुणाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी आलेल्या एका २५ वर्षीय तरुण भाविकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दर्शनासाठी रांगेत उभे असताना अचानक प्रकृती बिघडल्यानंतर जयदीप मेघराज नेमाडे या तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जयदीप हा मूळचा जळगाव येथील रहिवासी होता.

देखणे हे रूप दिसे! ‘श्रीमंतां’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर; पुण्यनगरीत भविकांचा उत्साह

ही घटना १७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११.४० वाजता घडली. जयदीप दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या मित्रांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला होता. दर्शनासाठी रांगेत उभा असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती मित्रांनी दिली.

रांगेतून बाहेर पडला अन् प्रकृती आणखी बिघडली

अस्वस्थ वाटू लागल्यानंतर जयदीप मित्रांना सांगून दर्शनाच्या रांगेतून बाहेर पडला. त्याची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात आल्यानंतर उपस्थित पोलिसांनी त्याला तातडीने मदत कक्षात नेले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जयदीपचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जळगावच्या नेमाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

जयदीप जळगावमधील शिरसोली रोड परिसरातील जीवनमोती सोसायटीत राहणाऱ्या नेमाडे कुटुंबातील होता. त्याचे वडील मेघराज सुभाष नेमाडे हे नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक असल्याचे सांगण्यात आले आहे. जयदीप त्यांचा एकुलता एक मुलगा होता.

मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जयदीप पुण्यात नोकरी करत होता. त्याच्या आईचे सुमारे १२ वर्षांपूर्वी निधन झाले होते. आता जयदीपच्या अचानक मृत्यूमुळे त्याच्या वडिलांवर मोठा आघात झाला आहे. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह जळगावला नेण्यात आला आणि तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दर्शन व्यवस्थेबाबत यापूर्वीही आरोप

लालबागचा राजा हे मुंबईतील सर्वाधिक गर्दी होणाऱ्या गणेश मंडळांपैकी एक आहे. दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात. गेल्या काही वर्षांत दर्शन रांग, गर्दीचे व्यवस्थापन आणि स्वयंसेवकांच्या वर्तनाबाबत काही भाविकांकडून आरोप करण्यात आले आहेत.

विशेषतः सामान्य भाविकांना दीर्घकाळ रांगेत थांबावे लागत असल्याची तक्रार अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे. दुसरीकडे काही व्हीआयपी आणि सेलिब्रिटींना तुलनेने वेगळी वागणूक मिळत असल्याचा आरोपही काही भाविकांनी केला आहे. मंडळाने मात्र व्हीआयपी पाससाठी पैसे घेतले जात असल्याचे आरोप यापूर्वी फेटाळले आहेत.

मानवाधिकार आयोगाकडूनही दखल

दर्शनादरम्यान काही महिला भाविकांशी धक्काबुक्की किंवा गैरवर्तन झाल्याच्या आरोपांची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. १० सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भात सुनावणी झाली असून पुढील सुनावणी ६ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती आहे.दरम्यान, जयदीप नेमाडेच्या मृत्यूच्या घटनेचा आणि दर्शन व्यवस्थापनाबाबत पूर्वीपासून सुरू असलेल्या आरोपांचा थेट संबंध असल्याचे सध्या उपलब्ध माहितीतून सिद्ध झालेले नाही.

Gauri Ganpati Visarjan: गौरी-गणपती विसर्जनाची परंपरा काय? जाणून घ्या घरगुती पूजेपासून विसर्जनापर्यंतची पद्धत

Web Title: 25 year old devotee jaideep nemade dies while waiting in lalbaugcha raja darshan queue mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Lalbaugcha Raja
  • Mumbai

संबंधित बातम्या

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल
1

Dadar Ganpati Visarjan: दादरच्या विसर्जनस्थळी गोंधळ? ‘VIP लोकांना वाट मोकळी, आम्हालाच अडवता’; VIDEO व्हायरल

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन
2

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन
3

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन

Gauri Visarjan 2026: गौरी विसर्जनाआधी हे नक्की वाचा! ‘या’ 7 गोष्टींची विशेष काळजी घ्या
4

Gauri Visarjan 2026: गौरी विसर्जनाआधी हे नक्की वाचा! ‘या’ 7 गोष्टींची विशेष काळजी घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.