Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lek Ladki Yojana: मुंबईतील 3 हजार 563 लाभार्थींना मिळणार लाभ; अंतिम लाभ मिळण्यासाठी काय आहे अट?

Lek Ladki Yojana: 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक अथवा दोन मुलींना योजनेचा लाभ लागू आहे. कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलगी या लाभासाठी पात्र राहील. कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 27, 2026 | 07:22 PM
lek ladaki yojana

lek ladaki yojana

Follow Us
Follow Us:

मुंबईतील 3 हजार 563 लाभार्थींना मिळणार लेक लाडकी योजनेचा लाभ
राज्य शासन राबवत आहे लेक लाडकी योजना 
राज्यात 1 एप्रिल 2023 सुरू करण्यात आलीये योजना 

मुंबई: मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी, शिक्षणासाठी प्रोत्साहित राज्य शासन ‘लेक लाडकी योजना’ राबवित आहे. या योजनेअंतर्गत मुंबई शहरातील 671 आणि मुंबई उपनगरातील दोन हजार 892 अशा एकूण तीन हजार 563 लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे.

माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) ही योजना अधिक्रमित करुन राज्यात 1 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतरच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी योजना” सुरु करण्यात आली आहे. ही योजना पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी वा तद्नंतर जन्मलेल्या मुलींकरिता लागू आहे. तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम एक लाखापेक्षा अधिक नसावे.

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांतील मुलींना शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी या योजनेतून टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर सहा हजार रुपये, इयत्ता सहावीत प्रवेशानंतर सात हजार रुपये आणि इयत्ता अकरावीत प्रवेशानंतर आठ हजार रुपये दिले जातात. मुलीने वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 75 हजार रुपयांचा अंतिम लाभ देण्यात येतो. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अंतिम लाभ मिळण्यासाठी मुलीने 18 वर्षे पूर्ण केलेली आणि ती अविवाहित असणे आवश्यक आहे.

Lek Ladki Yojana: मुलींच्या पालकांसाठी मोठी बातमी! ‘लेक लाडकी’ योजनेची प्रक्रिया सोपी; थेट खात्यात जमा होणार पैसे, जाणून घ्या

1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक अथवा दोन मुलींना योजनेचा लाभ लागू आहे. कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलगी या लाभासाठी पात्र राहील. कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

पात्र मुलींच्या पालकांनी जन्मनोंदणी व जन्मदाखल्यासह आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्यसेविका यांच्यामार्फत पात्रता आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते. लाभार्थींची माहिती ऑनलाइन प्रणालीत नोंदवून संबंधित स्तरावर प्रमाणित झाल्यानंतर नियमानुसार टप्प्याटप्प्याने आर्थिक लाभ दिला जातो.

Lek Ladki Yojana : मुलींना मिळणार 1 लाखांची मदत, तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या पटापट

अर्जासाठी मुलीचा जन्मदाखला, पालकांचे व लाभार्थी मुलीचे आधार कार्ड, पिवळे अथवा केशरी शिधापत्रिका, कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, लाभार्थी किंवा पालकांच्या बँक पासबुकची प्रत आणि संबंधित टप्प्यासाठी शाळेचा बोनाफाईड दाखला आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार कुटुंब नियोजन प्रमाणपत्र, अंतिम लाभासाठी मुलगी अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र तसेच शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेली अन्य कागदपत्रेही सादर करावी लागतील. पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नयेत यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस मार्गदर्शन आणि सहकार्य करीत आहेत.

अधिक माहितीसाठी

https://icds.gov.in/en/schemes/lek-ladki-yojana

Web Title: 3563 beneficiaries in mumbai to receive benefits under lek ladki scheme by maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Mumbai News

संबंधित बातम्या

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?
1

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा
2

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
3

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानात DYFI आणि SFI चे आंदोलन; ‘वोट चोरी’चा आरोप
4

Mumbai News : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आझाद मैदानात DYFI आणि SFI चे आंदोलन; ‘वोट चोरी’चा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.