मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील कथित घोटाळ्याची चौकशी (Inquiry Into Alleged Scam In Jalayukta Shivar Yojana) सुरु असतानाच, आता मविआ सरकारने (MVA Government) ऊर्जा प्रकल्पांच्या (Energy Projects) चौकशीचेही आदेश दिले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या ६५०० कोटींच्या ऊर्जा प्रकल्पांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फडणवीस सरकारमध्ये ऊर्जा खाते चंद्रशेखर बावनकुळे (Energy Department Chandrasekhar Bavankule) यांच्याकडे होते.
केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीतील (MVA) नेत्यांविरोधात सुरु केलेल्या कारवाईला हे उत्तर असल्याचे मानण्यात येते आहे. फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) कार्यकाळात ११ केव्ही उच्च दाबाच्या लाईनचे जाळे पसरवण्यात आले होते. यासाठी ६५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मविआ सरकार आल्यानंतर, एमएसईडीसीएलच्या (MSEDCL) विभागीय कार्यालयांनी गेल्या दोन वर्षांत ऊर्जा विभागाला ३३८७ कोटींच्या कामकाजांचे प्रस्ताव सादर केले. गेल्या १२ वर्षआंत १९ हजार कोटींची कामे झालेली असताना, पुन्हा तेच काम का केले जात आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
[read_also content=”नवाब मलिक विरुद्ध भाजपा- ‘Nawab Malik यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे’, बनावट नोटा प्रकरणी आरोपानंतर भाजपाच्या हाजी अराफत यांची टीका, आज मलिकांविरोधात करणार गौप्यस्फोट https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/bjps-haji-arafat-criticizes-malik-maliks-mental-balance-has-deteriorated-after-allegations-in-counterfeit-notes-case-nrvb-200991.html”]
दरम्यान अधिकारी करत असलेल्या चौकशीत नाशिक विभागात अनेक ठिकाणी घोटाळे झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी कोट्यवधींची बिले तयार केल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. ही सर्व माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना देण्यात आली असून, दोशींवर कठोर कारवाईचे आदेश राऊत यांनी दिले आहेत.
[read_also content=”आता डास तुम्हाला चावणार नाहीत तर स्पर्शही करू शकणार नाहीत आणि शून्य मिनिटात घराबाहेर काढतील पळ! https://www.navarashtra.com/health/health/now-mosquitoes-will-not-bite-you-they-will-not-even-touch-you-nrvb-200965.html”]
एका महिन्यात काय १५ दिवसांत चौकशी पूर्ण करा, फडणणवीस सरकारने काय काम केले हे जनतेला माहित असल्याची प्रतिक्रिया माजी उर्जामंत्री चंद्रशेख बावनकुळे यांनी दिली आहे. सरकारमधील दोन वर्षांचा भअरष्टाचार भाजपाने उघड केला म्हणून विरोधकांची मुस्काटदाबी करण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.