(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे बालदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशोक सराफ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर मनोगत व्यक्त करताना अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणाल्या की, “आजचा हा क्षण माझ्यासाठी खूपच इमोशनल होता. मी खरंच मंदा तुमची खूप खूप आभारी आहे. नुसता पुरस्कार मिळाला असं नाही, तर ज्यांच्याकडून पुरस्कार मिळाला, माझे गुरु, माझे पती, आज मी जी काही आहे, ती खरंच फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहे.’ मला माहेरचा पुरस्कार मिळाल्यासारखं वाटतंय, पण मला पतीकडून पुरस्कार मिळाल्याने सासरकडून मिळाल्याचंही समाधान आहे. आमचा ३७-३८ वर्षांचा संसार आहे. जितका काळ मी माहेरी घालवला, त्याहून जास्त काळ सासरी रमले. त्यामुळे दोन्हीचा सुरेख मिलाफ साधला आहे. कारण आपल्याकडे लग्न फक्त दोन व्यक्तीत नाही, तर कुटुंबात होतात, असंही निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या.
9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आमदार संजय केळकर… खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल.. मी भाजपची कट्टर फॅन आहे. “मला फार आनंद झाला, मी फार पूर्वीपासून भाजपची फॅन आहे,” असे निवेदिता सराफ यांनी म्हटले होते. यावर ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या बिहारमधील विजयावर आनंद व्यक्त करणाऱ्या निवेदिता सराफ यांच्या विधानावरही तीव्र शब्दांत टीका केली. यावर पेडणेकर यांनी, “तुमचा काय संबंध? कुठे काय झाल्यानंतर कधी येत नाहीत. आपलं काम करा पण नाही, चोच मारायचीच आहे कारण भाजपला खूश नाही केलं तर मोठी मोठी पारितोषिकं कशी मिळतील?” असे म्हणत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
De De Pyaar De 2 ‘ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? अजय देवगण Thamma चा विक्रम मोडू शकेल का?






