Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तदानासाठी ‘आर्ट गॅलरी’तून घातली कल्पक साद! एकात्मता, अध्यात्म आणि राष्ट्रीय भावनेतून जनजागृती करण्यावर दिला जाणार भर

अँन आर्ट गॅलरी फॉर नोबल कॉज ऑफ ब्लड डोनेशन' या संकल्पनेतून एकात्मता, अध्यात्म, धार्मिक समन्वय आणि राष्ट्रीय कर्तव्यभावना यांचा संगम साधत स्वेच्छा रक्तदानाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 05, 2026 | 11:30 AM
रक्तदानासाठी 'आर्ट गॅलरी'तून घातली कल्पक साद! एकात्मता, अध्यात्म आणि राष्ट्रीय भावनेतून जनजागृती करण्यावर दिला जाणार भर

रक्तदानासाठी 'आर्ट गॅलरी'तून घातली कल्पक साद! एकात्मता, अध्यात्म आणि राष्ट्रीय भावनेतून जनजागृती करण्यावर दिला जाणार भर

Follow Us
Follow Us:

“दानाचे नव्हे त्यागाचे असे। कार्य सर्व महाभागांचे असे ।।”
“हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई। सबको खून जरूरी है भाई ।।”
“धर्माच्या नावावर का हो करता रक्ताचा सडा? हेच रक्त ‘दान’ करून उपयोगी पाडा!”

अशा हृदयस्पर्शी आणि विचारप्रवर्तक घोषवाक्यांतून रक्तदानाचा संदेश देत महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यभरातील रक्तपेढ्यांसाठी एक अभिनव जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. ‘अँन आर्ट गॅलरी फॉर नोबल कॉज ऑफ ब्लड डोनेशन’ या संकल्पनेतून एकात्मता, अध्यात्म, धार्मिक समन्वय आणि राष्ट्रीय कर्तव्यभावना यांचा संगम साधत स्वेच्छा रक्तदानाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे ही अध्यात्मिक, ओवीबद्ध कवन परिषदेच्या सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी रचली आहेत. त्यांचा अभंग, भारूड, कविता यांचा गाढा अभ्यास असून फक्त रक्तदाना साठी त्यांनी अशा अनेक ओव्या रचल्या आहेत. हे फलक म्हणजे डॉ. पुरी यांच्या कामातील दोन टक्के भाग असून अनेक गाणी, व्हीडिओ रक्तदानाचे महत्व सांगत आहेत. परिषदेचे सहा. संचालक डॉ. पुरी यांनी गेल्या ३० वर्षांतील अनुभवातून पोस्टर्सची मालिका तयार केली आहे.(फोटो सौजन्य – istock)

क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा मोठा निर्णय

रक्तदानाबाबत दिला अत्यंत प्रभावी संदेश

-जसे जळाविना मासे, जसे पाण्याविना रोपटे, तसे रक्ताविना मानव, या ओळींतून रक्ताचे जीवनावश्यक महत्त्व अधोरेखित केले आहे. तर रक्तदान एकात्मतेचे प्रतीक हा संदेश देत धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या बंधनाची जाणीव करून दिली आहे. विशेष म्हणजे पैसे रक्तव दान करा! असा प्रभावी संदेश देत दानपेटीच्या पारंपरिक संकल्पनेलाच नवा अर्थ दिला आहे. धार्मिक भावनांना सकारात्मक वळण देत चर्माच्या नावावर रक्त सांडण्याऐवजी तेच रक्त दान करून जीव वाचवा, अशी साद या पोस्टर्समधून घालण्यात आली आहे. रक्तदानाला ‘त्याग’ आणि ‘श्रीगणेशा’चा पवित्र आरंभ मानत सामाजिक आध्यात्मिक संदर्भ जोडले गेले आहेत. “रक्ताचीये बळे, चाले जीवनाचे बाहुले या काव्यमय ओळींतून जीवनचक्र रक्तावर अवलंबून असल्याचा प्रभावी संदेश दिला आहे.

राज्यातील रक्तपेढ्यांनी पारंपरिक आवाहनांपलीकडे जाऊन अशा सर्जनशील अशा माहिती, शिक्षण, संवाद अशा माध्यमांचा करणे काळाची गरज असल्याचे डॉ. पुरी यांना वाटते. स्वेच्छा रक्तदानाच्या चळवळीला नवा वेग देण्यासाठी ही ‘आर्ट गॅलरी’ संकल्पना उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूणच, रक्तदानाला केवळ वैद्यकीय गरज न मानता सामाजिक, आध्यात्मिक आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सादर करण्याचा राज्य रक्त संक्रमण परिषदेचा हा कल्पक प्रयत्न ठरत आहे.

Mumbai AQI Level: होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित

८८ कोणत्याची धर्माचा, वयाच्या व्यक्ती मध्ये अध्यात्म असते. एखादी व्यक्ती रक्तदान करते म्हणजे त्ती अध्यात्मात मोडत असते, त्या व्यक्तीत चांगुलपणा असतो म्हणून तो दान करतो. दानापेक्षा मोठं पुण्य ते काय असते? म्हणून रक्तदान करण्यास प्रेरित केले जात आहे, असे मत – डॉ. पुरुषोत्तम पुरी, सहा. संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद यांनी व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: A creative saad worn from the art gallery for blood donation emphasis will be laid on creating awareness through integration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • art festival
  • Hospital
  • Mumbai News

संबंधित बातम्या

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा
1

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा

Mumbai News: पश्चिम रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत झाली मोठी वाढ! वर्षाला १३ कोटींची बचत; मुंबई सेंट्रल मंडळाची कामगिरी
2

Mumbai News: पश्चिम रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत झाली मोठी वाढ! वर्षाला १३ कोटींची बचत; मुंबई सेंट्रल मंडळाची कामगिरी

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल
3

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल

चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा पालिकेवर आरोप
4

चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा पालिकेवर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.