Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा

चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर वडाळा परिसरातील पावसाळी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी बीएमसी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. पाणी साचण्याच्या समस्या, नालेसफाई आणि धोकादायक झाडांची तपासणी यावर त्यांनी भर दिला.

  • By विवेक
Updated On: Jul 02, 2026 | 09:08 PM
चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा

Follow Us
Follow Us:

चेंबूर येथे शाळकरी मुलांच्या बसेसवर झाड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर मुंबईत पावसाळी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध भागांतील पावसाळी समस्यांवर लक्ष केंद्रित करत शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी आपल्या विभागात प्रत्यक्ष पाहणी आणि आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

मुसळधार पावसामुळे वडाळा परिसरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. काही ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नाल्याचे स्वरूप आले होते. या परिस्थितीची गंभीर दखल घेत नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी संबंधित बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अधिकाऱ्यांची तातडीने भेट घेतली. त्यांनी पाणी साचण्याची कारणे, नालेसफाईची स्थिती आणि आपत्कालीन उपाययोजनांचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.

यानंतर मनपा प्रशासनाने तातडीने पंपांच्या साहाय्याने साचलेले पाणी बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. तसेच नालेसफाई, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि नागरिकांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. परिसरातील धोकादायक झाडांची तपासणी, फांद्यांची छाटणी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठीही प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.

Mumbai Rain: निष्काळजीपणा नडला! उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; ४ अधिकारी निलंबित, कुटुंबाला १० लाखांची मदत

तृष्णा विश्वासराव या स्वतः विविध ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी करत आहेत. पावसाळ्यात नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, वाहतूक सुरळीत राहावी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद मिळावा, यासाठी त्या सातत्याने प्रशासनाशी समन्वय साधत आहेत.

चेंबूरमधील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात असून पावसाळ्याच्या काळात प्रत्येक विभागात नियमित पाहणी, नालेसफाई, झाडांची तपासणी आणि जलनिस्सारण व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सतर्कपणे काम करत असल्याचे या पाहणीतून दिसून येत आहे.

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल

Web Title: Trishna vishwasrao inspects monsoon preparedness after chembur tree incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • BMC
  • Mumbai News
  • Rain News

संबंधित बातम्या

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार
1

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
2

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
3

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
4

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.