Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटी वाचविण्यासाठी जनआंदोलनाची गरज; नेतृत्त्व प्रताप सरनाईक यांनीच करावे : श्रीरंग बरगे

राज्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या एसटी महामंडळाचा संचित तोटा १२ हजार कोटी रुपयांहून अधिक झाला आहे, तर वैधानिक देणी आणि थकीत रकमेचा आकडा ७ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 12, 2026 | 09:36 AM
पुढील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट; आर्थिक मदत न मिळाल्यास लालपरीची चाके थांबणार?

पुढील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट; आर्थिक मदत न मिळाल्यास लालपरीची चाके थांबणार?

Follow Us
Follow Us:

मुंबई : दररोज सुमारे ५५ लाख प्रवाशांची, जीवनवाहिनी असलेल्या आणि ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेशी निगडित एसटी महामंडळ अभूतपूर्व आर्थिक संकटातून जात असल्याने ती वाचविण्यासाठी राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याची वेळ आली आहे. या लढ्याचे नेतृत्व परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वतः करावे, असे आवाहन महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केले.

बरगे म्हणाले की, राज्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या एसटी महामंडळाचा संचित तोटा १२ हजार कोटी रुपयांहून अधिक झाला आहे, तर वैधानिक देणी आणि थकीत रकमेचा आकडा ७ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गर्दीचा हंगाम आणि भाडेवाढ असूनही यंदाच्या मे महिन्यात एसटीला ५० कोटी ६३ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला, विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच कालावधीत महामंडळाने १८ कोटी २२ लाख रुपयांचा नफा नोंदविला होता.

St Mahamandal : आता काय खैर नाही! एसटी स्थानकांभोवती अवैध प्रवासी वाहतुकीवर राज्यव्यापी धडक; २०० मीटर परिसरात विशेष मोहीम

या आर्थिक अडचणीच्या काळात राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची जबाबदारी महामंडळाची असल्याचे स्पष्ट केल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली असून, ८६ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था धोक्यात आल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.

एसटीच्या इतिहासाचा दाखला देताना बरगे यांनी सांगितले की, पूर्वी संकटाच्या काळात तत्कालीन अध्यक्ष पी. के. अण्णा पाटील, गिरीश बापट यांनी एसटीची पाठराखण केली होती. तसेच, मॅक्सी कॅबच्या स्पर्धेमुळे एसटीसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना तत्कालीन अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी स्वतः आंदोलनात सहभागी होत नेतृत्व केले होते.

आज पुन्हा तशीच निर्णायक परिस्थिती निर्माण झाली असून, एसटी वाचविण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून लोकचळवळ उभी राहणे आवश्यक असल्याचे बरगे यांनी म्हटले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

दुसरीकडे, एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची ऐतिहासिक घोषणा केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: A mass movement is needed to save the st pratap sarnaik should lead it says shrirang barge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • pratap sarnaik
  • Shrirang Barge

संबंधित बातम्या

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
1

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Buldhana News: १३ लाख ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ; मोफत प्रवासामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू फुलले
2

Buldhana News: १३ लाख ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ; मोफत प्रवासामुळे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

अकोल्यात 26 लाख 57 हजार ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ’; अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर
3

अकोल्यात 26 लाख 57 हजार ज्येष्ठांना ‘अमृत’ लाभ’; अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर

NCMC कार्ड नसेल तरीही सवलतीच्या दरात करता येणार प्रवास; पुन्हा मिळाली मुदतवाढ
4

NCMC कार्ड नसेल तरीही सवलतीच्या दरात करता येणार प्रवास; पुन्हा मिळाली मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.