Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC toll tax : राज्याची टोलमाफी, पण केंद्राच्या टोल नाक्यांवर एसटीला दिलासा नाही; सहा महिन्यांत ५.८१ कोटींचा अतिरिक्त भार

ST bus toll collection : राज्य सरकारकडून एसटीला टोलमाफी देण्यात आली असली तरी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील टोल नाक्यांवरून अजूनही टोल वसुली सुरू आहे. जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांत एसटी महामंडळाकडून टोलपोटी १३३.८७ कोटी रुपये खर्च झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 22, 2026 | 11:36 AM
राज्याची टोलमाफी, पण केंद्राच्या टोल नाक्यांवर एसटीला दिलासा नाही; सहा महिन्यांत ५.८१ कोटींचा अतिरिक्त भार

राज्याची टोलमाफी, पण केंद्राच्या टोल नाक्यांवर एसटीला दिलासा नाही; सहा महिन्यांत ५.८१ कोटींचा अतिरिक्त भार

Follow Us
Follow Us:
  • एसटीकडून सहा महिन्यांत ५.८१ कोटींची वाढीव टोल वसुली
  • केंद्राच्या टोल नाक्यांवर अजूनही आकारणी सुरू
  • जानेवारी ते जूनमध्ये १३३.८७ कोटींचा टोल खर्च
Maharashtra ST News Marathi : राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) बसांना राज्यातील टोल नाक्यांवर टोलमाफी दिली असली, तरी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर अजूनही टोल आकारला जात असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांत एसटी महामंडळाच्या टोल खर्चात गतवर्षीच्या तुलनेत ५ कोटी ८१ लाख १० हजार रुपयांची वाढ झाली आहे.

बरगे यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील १०५ टोल नाक्यांवर एसटी बसांकडून अद्यापही टोल आकारला जात आहे. याशिवाय नव्याने तयार झालेल्या राष्ट्रीय महामार्गांवर नवीन टोल नाके सुरू झाल्याने महामंडळावरील आर्थिक भार आणखी वाढला आहे. या मार्गांवरून दररोज अंदाजे ३० हजारांहून अधिक एसटी फेऱ्या होत असल्याने टोल खर्च सातत्याने वाढत आहे. महिनानिहाय आकडेवारीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये टोल खर्च २१.६२ कोटी रुपये झाला असून, तो गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांनी अधिक आहे. फेब्रुवारीमध्ये १९.२६ कोटी रुपये खर्च झाला असून १.११ कोटी रुपयांची वाढ झाली. मार्चमध्ये २१.०४ कोटी रुपये खर्च झाला आणि १.०५ कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली.

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

एप्रिलमध्ये टोल खर्च २२.४३ कोटी रुपये झाला असून, त्यात १.०१ कोटी रुपयांची वाढ झाली. मे महिन्यात हा खर्च २६.१५ कोटी रुपये झाला, जो गतवर्षीपेक्षा ६४.१० लाख रुपयांनी अधिक आहे. जूनमध्ये टोल खर्च २३.३५ कोटी रुपये झाला असून, त्यात ४१.०४ लाख रुपयांची वाढ झाली. एकूणच, जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत एसटीचा टोल खर्च १३३ कोटी ८७ लाख ३८ हजार रुपये झाला. याच कालावधीत २०२५ मध्ये हा खर्च १२८ कोटी ६ लाख २८ हजार रुपये होता. त्यामुळे सहा महिन्यांत ५ कोटी ८१ लाख १० हजार रुपयांची अतिरिक्त टोल वसुली झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

श्रीरंग बरगे यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीका करताना, एसटीला आर्थिक मदतीच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात टोलच्या माध्यमातून महामंडळावर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्याचे म्हटले आहे. आधीच तोट्यात असलेल्या एसटी महामंडळासाठी वाढता टोल खर्च चिंतेचा विषय असून, केंद्र सरकारनेही एसटीला टोलमाफी देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महिनानिहाय पाहिल्यास, जानेवारी २०२६ मध्ये टोल खर्च गतवर्षीच्या तुलनेत १ कोटी ५६ लाख ९९ हजार रुपयांनी वाढला. फेब्रुवारी २०२६ मध्ये ही वाढ १ कोटी ११ लाख ९१ हजार रुपये, तर मार्च २०२६ मध्ये १ कोटी ५ लाख १४ हजार रुपये इतकी नोंदवली गेली. त्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये टोल खर्चात १ कोटी १ लाख ९२ हजार रुपयांची वाढ झाली. मे २०२६ मध्ये वाढीचा आकडा ६४ लाख १० हजार रुपये, तर जून २०२६ मध्ये ४१ लाख ४ हजार रुपये इतका राहिला.

एकूण आकडेवारीनुसार, जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत एसटी महामंडळाचा टोल टॅक्सवरील संचित खर्च १३३ कोटी ८७ लाख ३८ हजार रुपये झाला. याउलट, जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत हा खर्च १२८ कोटी ६ लाख २८ हजार रुपये होता. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांत टोल खर्चात ५ कोटी ८१ लाख १० हजार रुपयांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ST Bus Fare Hike : एसटी प्रवाशांना झटका! 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, तिकीट किती रुपयांनी महागणार?

Web Title: St bus toll tax collection increased by rs 5 81 crore in six months central toll plazas maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • msrtc
  • Shrirang Barge
  • st bus
  • ST Employee

संबंधित बातम्या

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
1

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी
2

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा
3

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा
4

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.