Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar: “मुंबईत रंगला शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर; शरद पवार आणि खासदार नीलेश लंकेंची ‘आपला मावळा’साठी मोठी घोषणा!

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात ‘आपला मावळा महाराष्ट्र’ संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती सन्मानपूर्वक भेट देण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 20, 2026 | 06:27 PM
मुंबईत रंगला शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर; शरद पवार आणि खासदार नीलेश लंकेंची 'आपला मावळा'साठी मोठी घोषणा!

मुंबईत रंगला शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर; शरद पवार आणि खासदार नीलेश लंकेंची 'आपला मावळा'साठी मोठी घोषणा!

Follow Us
Follow Us:

पोपट पिटेकर,अहिल्यानगर : महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मिता जपण्याचे काम करणाऱ्या संस्थांना जेव्हा ज्येष्ठ नेतृत्वाचे प्रोत्साहन मिळते, तेव्हा त्या कार्याला एक नवी दिशा मिळते. असाच एक सुवर्णक्षण नुकताच मुंबईत पाहायला मिळाला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात बुधवारी पार पडलेल्या एका विशेष आणि दिमाखदार कार्यक्रमात ‘आपला मावळा महाराष्ट्र’ संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य व आकर्षक मूर्ती ज्येष्ठ नेते, खासदार शरदचंद्र पवार यांना सन्मानपूर्वक भेट देण्यात आली. या प्रसंगी अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत संघटनेच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यात आला, तसेच शिवचरित्र संवर्धनाचा दृढ निर्धार व्यक्त करण्यात आला.

शिवचरित्र घराघरांत पोहोचवण्याचा ‘आपला मावळा’चा संकल्

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे लोककल्याणकारी राज्यकारभार, अजोड शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि संस्कृती यांचा वारसा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत, विशेषतः आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आपला मावळा महाराष्ट्र’ संघटना सातत्याने ग्राउंड लेव्हलवर कार्यरत आहे. आजच्या डिजिटल युगात युवकांमध्ये शिवचरित्राविषयी आकर्षण निर्माण व्हावे, त्यांना आपल्या देदिप्यमान इतिहासाचे भान राहावे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा अभिमान जागृत व्हावा, या पवित्र उद्देशाने ही संघटना विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Bandra Demolition : वांद्रे गरीब नगर झोपडपट्टीवर कारवाईवेळी तणाव; पोलिसांवर पाणी-बादल्या फेकल्यानंतर लाठीचार्ज

“अशा संस्थांची आज समाजाला गरज” – शरद पवार

या सोहळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘आपला मावळा’ संघटनेच्या एकूणच कार्याचे तोंडभरून कौतुक केले आणि उपस्थित सर्व मावळ्यांना भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. “सामाजिक बांधिलकी जपत, कोणत्याही राजकीय स्वार्थापलीकडे जाऊन इतिहास संवर्धनाचे आणि तरुण पिढीला दिशा देण्याचे काम करणाऱ्या संस्थांची आजच्या समाजाला नितांत आवश्यकता आहे,” असे मत पवार साहेबांनी यावेळी व्यक्त केले. पवार साहेबांच्या या कौतुकाच्या शब्दांमुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला आहे. “साहेबांची थाप हीच आमची प्रेरणा” या प्रसंगी खासदार नीलेश लंके यांनी आपल्या भावना व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता अधोरेखित केली. ते म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे केवळ इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित नसून, ते आजच्या पिढीसाठी उत्तम व्यवस्थापन आणि राष्ट्र उभारणीचे प्रेरणादायी मार्गदर्शन आहेत.

ग्रामीण भागात जागर

‘आपला मावळा’ संघटनेच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास घराघरांत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये इतिहासाबाबत जागर निर्माण करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत.”

नवी ऊर्जा

“पवार साहेबांनी दिलेली कौतुकाची थाप आणि त्यांच्या शुभेच्छा आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. या प्रेरणेतून शिवरायांचे विचार अधिक व्यापक पातळीवर पोहोचविण्यासाठी आम्ही यापुढे अधिक जोमाने आणि ताकदीने कार्य करू असंही लंके यांनी म्हटलं आहे.

सांस्कृतिक अस्मितेच्या जतनाचा निर्धार

या संपूर्ण कार्यक्रमात केवळ मूर्ती प्रदान करण्यात आली नाही, तर शिवरायांच्या कार्याची आठवण करून देत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे जतन करण्याचा एक सामूहिक निर्धार व्यक्त करण्यात आला. समाजात सकारात्मक विचार, बंधुभाव आणि राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागण्यासाठी अशा उपक्रमांची आज मोठी गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. ‘आपला मावळा’ संघटनेच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Thane News: गुडघेदुखीने त्रस्त 52 वर्षीय महिलेला नवे आयुष्य; किम्स ठाणेत अत्याधुनिक गुडघा प्रत्यारोपण यशस्वी

Web Title: Aapala mavala maharashtra presents shivaji maharaj statue to sharad pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • Mumbai
  • Nilesh Lanke
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
1

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
2

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!
3

Kalagaurav Puraskar 2026: मुंबईत रंगणार ‘कलागौरव पुरस्कार’ सोहळा; ‘या’ क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान होणार!

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला
4

CJP Shivaji Park Protest: तुमच्या खुर्चीचे दोन्ही पाय चिकटवलेले ! अभिजीत दीपकेंचा फडणवीसांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.