Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जीव महत्त्वाचा, शॉर्टकट नको’; अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्गावर ‘झिरो डेथ’ अभियान, अपघात रोखण्यासाठी पोलिसांची मानवी साखळी

Railway Accident Prevention : मध्य रेल्वेवरील अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या मोरीवली गाव परिसरात रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांची संख्या चिंताजनक आहे. गेल्या तीन वर्षांत या परिसरात तब्बल 40 जणांचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 17, 2026 | 12:12 PM
‘जीव महत्त्वाचा, शॉर्टकट नको’; अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्गावर ‘झिरो डेथ’ अभियान, अपघात रोखण्यासाठी पोलिसांची मानवी साखळी

‘जीव महत्त्वाचा, शॉर्टकट नको’; अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्गावर ‘झिरो डेथ’ अभियान, अपघात रोखण्यासाठी पोलिसांची मानवी साखळी

Follow Us
Follow Us:
  • अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘झिरो डेथ’ अभियान
  • पोलिसांची मानवी साखळी, नागरिकांना गुलाब देत जनजागृती
  • अंबरनाथ जवळ मोरीवली गावात रेल्वे क्रॉसिंग करताना आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू
Central Railway News Marathi : मध्य रेल्वेवरील अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्गावरील वारंवार होणारे अपघात आणि त्यामध्ये होणारी जीवितहानी रोखण्यासाठी अंबरनाथ पोलिसांनी विशेष ‘झिरो डेथ’ अभियान सुरू केले आहे. रेल्वे ट्रॅक ओलांडताना होणाऱ्या निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेषतः अंबरनाथजवळील मोरीवली गाव परिसर हा अपघातप्रवण भाग म्हणून ओळखला जात असून, येथे आतापर्यंत तब्बल 40 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद आहे.

मुंबईकरांना दिलासा! पावसाळ्यात लोकलचा खोळंबा टळणार, सखल भागांतील रेल्वे कल्व्हर्ट्सवर बसणार लोखंडी कवच

या गंभीर परिस्थितीची दखल घेत पोलीस प्रशासनाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनोखी मोहीम हाती घेतली. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी रेल्वे मार्गालगत मानवी साखळी उभी करून नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिला. रेल्वे ट्रॅक ओलांडण्यासाठी अधिकृत मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. या मोहीमेदरम्यान ट्रॅक ओलांडणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फूल देऊन त्यांना सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. “काही मिनिटांचा शॉर्टकट जीवावर बेतू शकतो” हा संदेश देत रेल्वे रुळांवरून अनधिकृतपणे ये-जा करणे किती धोकादायक आहे, याची माहिती देण्यात आली.

मध्य रेल्वेच्या डीसीपी प्रज्ञा जेडगे आणि कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना रेल्वे फाटक, पादचारी पूल किंवा अधिकृत मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मोबाईलवर बोलत, हेडफोन लावून किंवा घाईगडबडीत रेल्वे ट्रॅक ओलांडल्यामुळे अनेक अपघात घडत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येणाऱ्या या ‘झिरो डेथ’ अभियानाचा उद्देश केवळ नियमांचे पालन करवून घेणे नसून, नागरिकांच्या मनात रेल्वे सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. अपघातमुक्त रेल्वे परिसर निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मोरीवली परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम महत्त्वाची मानली जात असून, भविष्यात अशा घटनांवर आळा बसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रेल्वे अपघात टाळण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Railway Loco Pilot Career: भारतीय रेल्वेत ‘लोको पायलट’ कसे व्हावे? जाणून घ्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि ट्रेनिंगबद्दल!

Web Title: Ambernath badlapur railway track zero death campaign police awareness drive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Accident
  • central railway
  • kalyan
  • railway

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Miraj Slab Collapse: मिरज शासकीय रुग्णालयात मोठी दुर्घटना; बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून ७ मजूर जखमी
2

Miraj Slab Collapse: मिरज शासकीय रुग्णालयात मोठी दुर्घटना; बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून ७ मजूर जखमी

Exclusive: काशिमीरात मेट्रो ब्रिजखाली थरार! तरुणाच्या अंगावर कोसळला सिमेंटचा ब्लॉक; घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ ‘नवराष्ट्र’च्या हाती
3

Exclusive: काशिमीरात मेट्रो ब्रिजखाली थरार! तरुणाच्या अंगावर कोसळला सिमेंटचा ब्लॉक; घटनेचा थरारक CCTV व्हिडिओ ‘नवराष्ट्र’च्या हाती

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
4

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.