Rohit Pawar Press Conference: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधानावर राज्यभरातून संशय व्यक्त केला जात आहे. या सगळ्या घटनाक्रमावर रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेतून भाष्य केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अजितदादांचा विमान अपघात हा अपघात नसून घातपात असू शकतो. याचा तपास देशातील तपास यंत्रणांसह परदेशातील तपास यंत्रणांकडून व्हावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. (Ajit Pawar Plane crash)
रोहित पवार म्हणाले, अजितदादांचा २८ जानेवारीला कारने जाण्याचा प्लॅन होता. पण काही कारणं काढून मुंबईतच त्यांचा वेळ कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी घाई गडबडीत अजितदादा विमानाने कसे जातील असं काही प्लॅनिंग झालं होतं का, विमानाचे दोन्ही पायलट ऐनवेळीच कसे बदलण्यात आले,असे अनेक प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत. VSR कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं, त्याचा रिपोर्ट अजूनही का समोर आला नाही, असाही प्रश्न रोहित पवारांनी विचारला.
अजित पवार कारने बारामतीला येणार होते, पण ते विमानाने कसे जातील, यासाठी कोणी प्रयत्न केले होते का याचा तपास करावा, अशी मागणी रोहित पवारांकडून करण्यात आली आहे. तसेच, विमान अपघातावेळी पायलटने मेडे कॉल का केला नाही, विमानाचा ट्रान्सपाँडर जाणीवपूर्वक बंद करण्यात आला का, पायलटला विानाचा अपघातच घडवायचा होता का, असेही अनेक प्रश्न रोहित पवार यांनी विचारले आहेत. तसेच, दादांच्या अपघाताची चौकशी ही इथल्या संस्थेने करावी, पण त्याचवेळी फ्रान्स किंवा अमेरिकेच्याही संस्थांमार्फत केली जावी, अशी मागणी रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.
अपघाताचा तपशील: अजित पवार ज्या ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते ते १६ वर्षे जुने होते. या लेअरजेट विमानाने त्यांना मुंबई ते बारामती असा २१० किमीचा प्रवास करायचा होता. सकाळी ८:१० वाजता विमानाने टेक ऑफ केले. लोणावळ्याजवळ ८:४३ ते ८:४५ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. सकाळी ९:४५ वाजता त्यांच्या निधनाची अधिकृत बातमी आली. कंपनीच्या मालकांनी दाट धुक्यामुळे अपघात झाल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्षदर्शींनुसार विमान एका बाजूला कलले होते आणि खाली येताच त्याचा स्फोट झाला. यामुळे तांत्रिक बिघाडाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विमानाची स्थिती: विमान एका बाजूला का कलले? त्यात तांत्रिक किंवा मेकॅनिकल बिघाड होता का?
तपासणी अहवाल: टेक ऑफपूर्वी विमानाची रीतसर पाहणी झाली होती का? विमानाचा ‘टेकलॉग’ आणि ‘एअरवर्थी रिपोर्ट’ कुठे आहे?
देखभाल (Maintenance): विमानाचे नियमित मेंटेनन्स कोणी केले होते? हँगरमधील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे का?
मोठी दुरुस्ती: विमानाचे ‘हेव्ही मेंटेनन्स’ कधी झाले होते आणि त्याचा अहवाल काय सांगतो?
सुरक्षितता: दोन दिवसांपूर्वी सुरतवारी करून आलेल्या या विमानाची तांत्रिक क्षमता प्रवासासाठी योग्य होती का?
अपघाताला १३-१४ दिवस उलटूनही सीसीटीव्ही गोळा करण्यापलीकडे ठोस प्रगती झालेली नाही. या विलंबामुळे संबंधित कंपनीला खोटे पुरावे तयार करण्याची संधी मिळाल्याची भीती व्यक्त होत आहे. बारामती विमानतळावर ILS (Instrument Landing System) नसल्याचे कारण पुढे केले जात आहे, परंतु ते कितपत सत्य आहे हा तपासाचा विषय आहे.
कंपनीचा वादग्रस्त इतिहास: ‘व्हीएसआर’ कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वीही अपघात झाला होता, मात्र त्याचा तपास अहवाल अद्याप समोर आलेला नाही. हा जुना अहवाल दाबला गेल्यामुळेच आजची दुर्घटना घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय बंदी आणि भारतीय दुर्लक्ष: ज्या कंपनीच्या विमानाला सुरक्षेच्या कारणास्तव युरोपमध्ये बंदी घालण्यात आली आहे, तीच विमाने भारतात कोणत्याही अडथळ्याविना कशी काय उड्डाण करत आहेत? याकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष गंभीर आहे.






