Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Boisar Accident : तीन दिवसांत तीन बळी! भरधाव अवजड वाहतुकीने घेतला आणखी एक जीव; बोईसरमध्ये डंपरच्या धडकेत वृद्ध ठार

बोईसर परिसरात भरधाव अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून सोमवारी झालेल्या भीषण अपघातात ७० वर्षीय सलीम अफजल इंद्रजी यांचा जागीच मृत्यू झाला. बोईसर-तारापूर मार्गावरील स्टेट बँकेसमोर भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिल्यानंतर ते मागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 08, 2026 | 05:33 PM
Hit and Run Case : नागपुरात 'हिट अँड रन'; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

Hit and Run Case : नागपुरात 'हिट अँड रन'; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

Follow Us
Follow Us:
  • बोईसर-तारापूर मार्गावर डंपरच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
  • भरधाव अवजड वाहतुकीविरोधात नागरिकांचा संताप
  • तीन दिवसांत तीन जणांचा बळी
सुशांत संखे, बोईसर : बोईसर परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून सोमवारी (8 जून 2026) झालेल्या आणखी एका भीषण अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला. मागील दोन-तीन दिवसांत अवजड वाहनांच्या धडकेत तीन नागरिकांचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

बोईसर-तारापूर मार्गावरील स्टेट बँकेसमोर सोमवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सलीम अफजल इंद्रजी (वय ७०) हे रस्त्याच्या कडेला चालत असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (एमएच-०४-सी-१३५७) त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर ते डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Car-Free Friday: नो कार, नो कॅब… फक्त सार्वजनिक वाहतूक! मुंबईच्या बीकेसीमध्ये देशातील पहिला ‘कार-फ्री फ्रायडे’ उपक्रम सुरू

या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तारापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तीन दिवसांत तीन नागरिकांचा बळी

पालघर जिल्ह्यात अवजड वाहनांच्या धडकेत अवघ्या तीन दिवसांत तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोईसर परिसरात यापूर्वी प्राप्ती प्रवीण जाधव आणि डॉ. विष्णूप्रभा या दोन तरुणींचाही अवजड वाहनांच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे अवजड व गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. नागरिकांनी प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक शाखेने विशेष तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालावेत, अशी मागणी केली आहे.

पदपथांवरील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान, बोईसर रेल्वे स्थानक ते विजय नगर परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीने राबविलेली फेरिवाले हटाव मोहीम अपयशी ठरल्याची टीका होत आहे. पदपथांवर लाखो रुपये खर्च करूनही पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “पदपथ पादचाऱ्यांसाठी की फेरिवाल्यांसाठी?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Bhayander News: भाईंदरमधील वादग्रस्त अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई; बाळासाहेब ठाकरे कलादालनाचा मार्ग मोकळा

Web Title: Boisar dumper accident elderly man death heavy vehicle accidents rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • Accident
  • Boisar
  • maharashtra

संबंधित बातम्या

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील
1

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब
2

MSRTC News: एसटी महामंडळ संकटात; 4,500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी
3

Dharashiv News: शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका; पीकविमा, अनुदानासह तातडीच्या मदतीची काँग्रेसची मागणी

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी
4

Zilla Parishad School: भिंतींना तडे, छताला गळती; धोकादायक इमारतीत ६८ विद्यार्थ्यांचे भविष्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.