Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bullet Train Project: एक ते दीड किमी रस्ता चिखलाने व्यापला; बुलेट ट्रेनच्या कामामुळे नागरिकांची जीवघेणी कसरत

Bullet Train Project: नालासोपारा पूर्वेतील गावराई नाका परिसरात बुलेट ट्रेनच्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. स्थानिकांनी तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 03, 2026 | 12:45 PM
एक ते दीड किमी रस्ता चिखलाने व्यापला; बुलेट ट्रेनच्या कामामुळे नागरिकांची जीवघेणी कसरत

एक ते दीड किमी रस्ता चिखलाने व्यापला; बुलेट ट्रेनच्या कामामुळे नागरिकांची जीवघेणी कसरत

Follow Us
Follow Us:
  • बुलेट ट्रेनच्या कामामुळे गावराई नाका चिखलमय
  • नागरिकांचे हाल, अपघातांची मालिका
  • एक ते दीड किमी रस्ता चिखलाने व्यापला
Bullet Train Project: वसई-विरार शहरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी अनेक रस्त्यांची अवस्था अद्यापही बिकट आहे. नालासोपारा पूर्वेतील गावराई नाका परिसरात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या (Bullet Train Project) सुरू असलेल्या कामांमुळे सुमारे एक ते दीड किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून नागरिकांना रोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गावराई नाका परिसरात सुरू असलेल्या बुलेट ट्रेनच्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेला अत्यंत सावधगिरीने चालावे लागत असून अनेक ठिकाणी घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत.

अपघातांची मालिका

दुचाकीस्वारांनाही या चिखलमय रस्त्याचा मोठा फटका बसत आहे. चिखलामुळे वाहनांचे संतुलन बिघडून वारंवार अपघात होत असून अनेक वाहनचालक जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तसेच वाहनांच्या चाकांमधून उडणाऱ्या चिखलामुळे नागरिकांचे कपडे खराब होत असून शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.

#BreakingNews: जपानच्या नव्हे भारताच्या , बुलेट ट्रेनवर जपानच्या माजी न्याय मंत्र्याने व्यक्त केली नाराजी

स्थानिक रहिवाशांनी संबंधित यंत्रणांकडे अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप केला आहे. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून चिखल हटवावा, तसेच वाहतुकीसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांमुळे परिसरातील वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मुंबईतील भुयारी मार्गाच्या कामाला वेग आला असून, घणसोली ते शिळफाटा दरम्यानचे ४.८ किलोमीटरचे भुयारी खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. हे काम ‘एनएटीएम’ (New Austrian Tunnelling Method) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे. मुंबईतील सुमारे २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गासाठी दोन अत्याधुनिक तंत्रांचा वापर केला जात आहे. त्यामध्ये ‘टीबीएम’ (Tunnel Boring Machine) आणि ‘एनएटीएम’ (New Austrian Tunnelling Method) या पद्धतींचा समावेश आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून खोदकाम सुरू आहे.

घणसोली ते शिळफाटा हा टप्पा ‘एनएटीएम’ पद्धतीने पूर्ण करण्यात आला आहे. या तंत्राचा वापर प्रामुख्याने कठीण भूभाग, खडकाळ रचना आणि बदलत्या भूगर्भीय परिस्थितीत सुरक्षित व अचूक खोदकामासाठी केला जातो. दरम्यान, विक्रोळी ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील बुलेट ट्रेन स्थानकापर्यंतचा भुयारी मार्ग ‘टीबीएम’ (Tunnel Boring Machine) द्वारे तयार केला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक कटरहेड (Cutterhead) विक्रोळी येथील शाफ्टमध्ये यशस्वीरित्या उतरवण्यात आला असून, लवकरच या टप्प्यातील खोदकामाला वेग मिळणार आहे.

Bullet Train India: खुशखबर! २०२७ पासून भारतात धावणार बुलेट ट्रेन; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, अनेक मार्गांवर काम सुरू

Web Title: Bullet train work turns gavrai naka road muddy nalasopara residents face hardship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Bullet Train
  • maharashtra
  • Road Accident

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.