Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai School bus Accident: मुंबईत मोठी दुर्घटना! शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने 12 विद्यार्थी जखमी, एका विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबईतील चेंबुर परिसरात विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेच्या बसवर अचानक झाड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. रोड क्रमांक 11 येथे घडलेल्या या घटनेत 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, बसमध्ये अडकलेल्या एका विद्यार्थ्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 30, 2026 | 06:04 PM
मुंबईत मोठी दुर्घटना! शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने 10 विद्यार्थी जखमी, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबईत मोठी दुर्घटना! शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने 10 विद्यार्थी जखमी, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • चेंबुरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले
  • 10 विद्यार्थी गंभीर, एक बसमध्ये अडकला
  • एकाची सुखरूप सुटका
Chembur School Bus Incident News Marathi : मुंबईतील चेंबूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर अचानक एक मोठे झाड कोसळले. हा अपघात चेंबूरमधील रस्ता क्रमांक ११ वर घडला. या घटनेच्या वेळी बसमध्ये शाळकरी मुले होती. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात १० शाळकरी मुले गंभीर जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघातानंतर बचाव पथकांनी मुलांना बाहेर काढले, परंतु एक मूल आत अडकले होते. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. झाड पूर्णपणे बसवर कोसळल्याने छताचा चक्काचूर झाला, ज्यामुळे बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.

महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला, पण चौकशी त्याचीच? महापौर रितू तावडेंच्या आदेशावर वर्षा गायकवाडांचा संताप

एका विद्यार्थ्याचा मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार, बसमध्ये एकूण १३ शाळकरी मुले होती. ही बस एका प्रतिष्ठित शाळेची होती. चेंबूरमधील रस्ता क्रमांक ११ वरून जात असताना बसवर अचानक एक मोठे झाड कोसळले.

अपघातात बसमधील दहा मुले गंभीर जखमी झाली असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक मूल बसमध्ये अडकले होते आणि त्याला बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

अग्निशमन दलांकडून बचावकार्य सुरु

या घटनेनंतर, मोठ्या संख्येने स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात मदत करण्यासाठी स्वयंसेवा केली.

यानंतर, अग्निशमन दल, महानगरपालिका आणि पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. बसमध्ये अडकलेल्या मुलांना प्रथम बाहेर काढून नंतर रुग्णालयात नेण्यात आले.या घटनेनंतर, स्थानिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

राहुल शेवाळे म्हणाले की, शाळेच्या बसमध्ये १३ ते १५ विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली. सर्वांना बाहेर काढण्यात आले असून, एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. बसवर पडलेले झाड हटवण्यासाठी क्रेनही आणण्यात आले असून, सध्या वेगाने काम सुरू आहे.

काय म्हणाल्या महापौर?

“चेंबूरमधील रोड ११ वर दुर्दैवी घटना घडली आहे. ही बस मुलांना शाळेत घेऊन जात होती, त्यावेळी डायमंड गार्डनजवळ असलेल्या हेरिटेज इमारतीजवळच हे झाड बसवर कोसळले. बसमध्ये १३ विद्यार्थी होते. १२ विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आहे”, अशी माहिती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली.

Mumbai Rain Updates: मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग! सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात; ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

Web Title: Chembur school bus tree fall 10 students injured mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Mumbai
  • school bus

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
1

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
2

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र
3

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना
4

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.