• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Chhagan Bhujbal Reaction On Budget Nrps

केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चूहा!

अर्थसंकल्प सादर करतांना निव्वळ आकडेवारीचा खेळ केलेला दिसतो. यातून हाती काही न लागता यात फक्त फुगवलेले आकडे दिसतात. प्रत्यक्षात जनतेच्या हाती काय लागेल हा प्रश्नच असून किमान निवडणूक संकल्प म्हणून तरी जनतेला दिलासा देणे गरजेचे होते.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 01, 2022 | 04:13 PM
केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे खोदा पहाड निकला चूहा!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपल्या भाषणातून अर्थसंकल्प सादर केला खरा मात्र निव्वळ घोषणाबाजी पलीकडे ठोस काहीही मिळाले नसून केंद्राने अर्थसंकल्पातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची घोर निराशा केली आहे. केंद्राचा हा अर्थसंकल्प म्हणजे ‘खोदा पहाड आणि निकाला चूहा’ असल्याची टीका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्प सादर करतांना निव्वळ आकडेवारीचा खेळ केलेला दिसतो. यातून हाती काही न लागता यात फक्त फुगवलेले आकडे दिसतात. प्रत्यक्षात जनतेच्या हाती काय लागेल हा प्रश्नच असून किमान निवडणूक संकल्प म्हणून तरी जनतेला दिलासा देणे गरजेचे होते. काही राज्यात निवडणुका असताना सर्वसामान्यांना या बजेटमधून काही लाभ होईल असे मला वाटले होते. मात्र केंद्राने फक्तच फुगीर आकडे दाखवले सर्वसामान्यांच्या वाट्याला मात्र भोपळाच आला असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

[read_also content=”हा अर्थसंकल्प देशाचा की आयटी डिपार्टमेंटचा होता… https://www.navarashtra.com/india/nawab-malik-reaction-ob-budget-nrps-230855.html”]

त्यांनी म्हटले आहे की, केंद्राला जानेवारीमध्ये २०२२ मध्ये १ लाख ४० हजार ९८६ कोटी एव्हढा जीएसटी मिळाला असे अर्थमंत्री सांगतात मग राज्यांचा जीएसटी त्यांना का दिला जात नाही हे मात्र न उलगडनारे कोड आहे. गेले दोन वर्ष संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत असून कोरोना काळात ४ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र केंद्राने आजच्या बजेटमध्ये फक्त ६० लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले आहे. म्हणजेच देशातील बेरोजगारांना नोकरी देण्यास सरकार सफशेल अपयशी ठरल्याचे दिसते आहे. असंघटीत कामगार शेतमजूर यांना याचा सर्वाधिक फटका बसला मात्र त्यांच्यासाठी कुठलीही विशेष तरतूद यामध्ये दिसून येत नाही. कोरोनाकाळात तयार झालेली गरीब श्रीमंत दरी कमी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केला गेला नाही. मागच्या अर्थसंकल्पात विकासदर ११ टक्के पर्यंत दाखवला होता ह्या अर्थसंकल्पात मात्र ९.२ दाखवला आहे. नरेगा (राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) मध्ये अनेक लोकांनी काम केले. मात्र नरेगाचा उल्लेख सुद्धा या अर्थसंकल्पात नाही. अर्थसंकल्पातून कष्टकरी वर्गाच्या तोडाला पाने पुसली असून कुठलीही ठोस हमी केंद्र सरकारने दिलेली नाही. तसेच देशाच्या संरक्षणावरील सुद्धा निधी कमी केला ही देखील चिंताजनक बाब असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

[read_also content=”बावनकुळे हे तब्बल पाच हजार कोटींचे मालक, अमाप काळा पैसे असल्याचा नातेवाईकांचा साक्षीदारासह आरोप https://www.navarashtra.com/latest-news/bawankule-owns-rs-5000-crore-relatives-allege-with-immense-black-money-nraa-230913.html”]

विशेष म्हणजे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय सर्वसामान्य नागरिकांना करसवलतीच्या माध्यमातून दिलासा देण्याची आवश्यकता होती. मात्र गेल्या पाच अर्थसंकल्पाप्रमाणे यंदाच्या सहाव्या अर्थसंकल्पात देखील त्यात कुठलाही बदल गेला न गेल्याने सर्वसामान्य करदात्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षात कोरोनाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी यंदाही निराशा पडली आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद या अर्थसंकल्पातून होईल अशी अशा होती मात्र त्यांच्याही पदरी निराशा पडली आहे. केंद्रात सत्तेत आल्यानंतर सरकारने एकीकडे खतांवरील सबसिडी बंद करून शेतकऱ्यांना अडचणीत आणले, आणि आता म्हणता एमएसपी वाढवणार असल्याची घोषणा केली. शेतकऱ्यांचा शेती उत्पादनातला खर्च अधिक असताना शेतकऱ्यांना कोणताही दिलासा या सरकारने दिलेला नाही. जेष्ठ नागरिकांच्या समस्येकडे देखील केंद्र सरकारने कानाडोळा केला आहे. जेष्ठ नागरिकांसाठी देखील कोणतीच सुविधा दिली नाही. निव्वळ आपल्या भाषणातून भूलभूलय्या करत सर्वसामान्य नागरिकांच्या पदरी निरशा देण्यापलीकडे सरकारच्या अर्थसंकल्पात ठोस काही दिसत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

[read_also content=”नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यावर अटकेचा पेच, सिंधुदुर्ग न्यायालयाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा, निलेश राणेंची पोलिसांकडे वॉरंटची मागणी https://www.navarashtra.com/latest-news/kokan/sindhudurg/nitesh-rane-bail-application-rejected-by-sindhudurg-session-court-but-no-clarity-on-arrest-nrsr-230869.html”]

Web Title: Chhagan bhujbal reaction on budget nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2022 | 04:13 PM

Topics:  

  • Budget latest news
  • Chhagan Bhujbal

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद पेटणार; छगन भुजबळांच्या पालकमंत्रीपदाला सुहास कांदेंचा विरोध
1

Nashik News: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद पेटणार; छगन भुजबळांच्या पालकमंत्रीपदाला सुहास कांदेंचा विरोध

“भुजबळ तेल लावलेले पैलवान तर गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे..; कुंभमेळ्याच्या श्रेयवादावरुन रंगलं राजकारण
2

“भुजबळ तेल लावलेले पैलवान तर गिरीश महाजन त्यांच्यासमोर बच्चे..; कुंभमेळ्याच्या श्रेयवादावरुन रंगलं राजकारण

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम
3

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान
4

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Asia cup 2025 : ‘..त्याच्यासारखी कामगिरी कुणाची नाही’, अय्यरच्या समर्थनार्थ ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची मैदानात उडी

Asia cup 2025 : ‘..त्याच्यासारखी कामगिरी कुणाची नाही’, अय्यरच्या समर्थनार्थ ‘या’ माजी भारतीय क्रिकेटपटूची मैदानात उडी

फक्त 11 हजारात बुक करता येणार ‘ही’ कार, Tata Curvv च्या निर्मात्यांची उडाली आहे झोप

फक्त 11 हजारात बुक करता येणार ‘ही’ कार, Tata Curvv च्या निर्मात्यांची उडाली आहे झोप

पाताळलोकात केली जाते भगवान गणेशाची पूजा? जाणून घ्या काय आहे याची मनोरंजक कथा

पाताळलोकात केली जाते भगवान गणेशाची पूजा? जाणून घ्या काय आहे याची मनोरंजक कथा

भारताचा ‘द वॉल’! Rahul Dravid ‘या’ गोलंदाजाविरुद्ध खेळायला घाबरायचा; आर आश्विन समोर दिली मोठी कबुली.. 

भारताचा ‘द वॉल’! Rahul Dravid ‘या’ गोलंदाजाविरुद्ध खेळायला घाबरायचा; आर आश्विन समोर दिली मोठी कबुली.. 

घाणीने भरलेले आहेत रोजच्या आहारातील हे पदार्थ; डॉक्टरांनी सांगितल्या पेस्टसाइड्सने भरलेल्या भाज्यांची आणि फळांची नावे

घाणीने भरलेले आहेत रोजच्या आहारातील हे पदार्थ; डॉक्टरांनी सांगितल्या पेस्टसाइड्सने भरलेल्या भाज्यांची आणि फळांची नावे

पुढील आठवड्यात शेअर बाजारात होईल मोठी हालचाल, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, जाणून घ्या

पुढील आठवड्यात शेअर बाजारात होईल मोठी हालचाल, गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, जाणून घ्या

‘Nepo Baby’, करण जोहरने मुलाला म्हटले नेपो बेबी, मिळाले असे उत्तर की बोलतीच बंद! Video Viral

‘Nepo Baby’, करण जोहरने मुलाला म्हटले नेपो बेबी, मिळाले असे उत्तर की बोलतीच बंद! Video Viral

व्हिडिओ

पुढे बघा
Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Gondia : ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची वाताहत; चिरचाडबांध परिसरात नागरिक रस्त्यावर

Gondia : ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची वाताहत; चिरचाडबांध परिसरात नागरिक रस्त्यावर

Mumbai Goa Highway: चिखलाचे साम्राज्य, यंदाच्या वर्षीही चाकरमान्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट

Mumbai Goa Highway: चिखलाचे साम्राज्य, यंदाच्या वर्षीही चाकरमान्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट

Yatmal News : पैनगंगा नदीच्या पुराने यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Yatmal News : पैनगंगा नदीच्या पुराने यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

नवभारत – नवराष्ट्रच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर दिले उत्तर

नवभारत – नवराष्ट्रच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर दिले उत्तर

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.