कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित कौटुंबिक स्नेहमेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक मोहन उगले यांच्या पुढाकाराने झालेल्या या स्नेहमेळाव्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि परिवारांनी सहभाग नोंदवला. परस्पर संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि परिवारांमधील जिव्हाळा वाढवणाऱ्या विविध उपक्रमांमुळे कार्यक्रमाला उत्साह आणि आनंदाची रंगत आली. कल्याणमध्ये पक्षाच्या संघटनात्मक बळकटीचे हे प्रदर्शन ठरले, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.