(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान The Ba***ds Of Bollywood च्या सीरिजमुळे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहे. आर्यनला 2021 साली ड्रग्स प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंनी ताब्यात घेतलं होते. हे प्रकरण आजूनही चर्चेत आहे. आर्यनने इतक्या वर्षांनी The Ba***ds Of Bollywood ही सीरिज बनवली, या सीरिजमध्ये समीर वानखेडेंसारखी एक भूमिका दाखवण्यात आली आहे. या दृश्यावर आक्षेप घेत समीर वानखेडेंनी कोर्टात धाव घेतली आणि त्यांनी आरोप केला आहे की, सीरिजमधील एका विशिष्ट दृश्यातून त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. यानंतर वानखेडेंनी मानहानीची केस दाखल केली आहे. आता या प्रकरणावर क्रांती रेडकरने प्रतिक्रिया दिली आहे.
क्रांती रेडकरने अलिकडेच एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केले, ती म्हणाली,”या सगळ्याचा त्रास होतोच. मीही क्रिएटिव्ह क्षेत्रातलीच आहे. त्यामुळे मला कोणाला वाईट बोलायचे नाही.तुम्ही चांगला कंटेंट बनवता ना, तुमच्या पद्धतीने बनवता ना; बनवा की. चांगला कंटेंट बनवा. लोकांचं मनोरंजन होईल असा बनवा. पण कोणाच्यातरी डोक्यावर पाय ठेवून त्याला पाण्यात बुडवून तुम्ही मोठे व्हायचा का प्रयत्न करता? तुम्ही मोठेच आहात. तुम्हाला या सगळ्या गोष्टीची काही गरज नाही. मोठे व्हा…आकाश मोठं आहे. तो फक्त एक छोटा अधिकारी आहे आणि मी त्याची छोटीशी बायको. किती वर्ष तुम्ही ते धरुन बसणार आहात. तुम्हाला उत्तम बनवायचं तर बनवा, एका शासकीय ऑफिसरची नक्कल करत आहात. किंवा देशातील सर्वच अधिकाऱ्यांची तुम्ही नक्कल करताय? कशा कशाचा अपमान करणार आहात? याला कुठेतरी मर्यादा हवी. पण या सगळ्याची खिल्ली उडवण्यानं आपणच लहान होतो. छोटे नका होऊ; मोठे व्हा.”
पुढे अभिनेत्री म्हणाली, एखाद्या माणसाला तुम्ही किती त्रास देणार. तो एका गोष्टीसाठी म्हणून उभा राहिला. इतक्या हजारो केस त्यानं हँडल केल्या. पण एकाच केसमध्ये तो चुकीचा ठरतो? एकाच केसमध्ये तो लाचखोर ठरतो? एकाच केसमध्ये त्याला मिळालेले अनेक पुरस्कार वगैरे खोटे ठरतात? एकाच केसमुळे त्यांना ट्रोल केलं जातं. त्यांना धमक्या येतात. मग त्यावर वेब सीरिज बनतात आणि त्यातून याबद्दल चित्रण केलं जातं.”
Vicky Kaushalच्या नव्या चित्रपटात Deepika Padukoneची एंट्री? अफवा की सत्य – जाणून घ्या
क्रांती रेडकर म्हणाली की, “किती जिव्हारी लागली आहे तुमच्या? ठीक आहे, केस सुरु आहे, पण ही केस फक्त समीर वानखेडेंची नाही. ही केस त्या संस्थेची आणि तिथल्या सर्व मेहनत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे. एनसीबीमध्ये काम करणाऱ्या २६ अधिकाऱ्यांवरही ही मानहानीची केस आहे, कारण त्यांचे कुटुंब घरी असताना हे चार दिवस ऑपरेशनवर असत. सुरक्षा नसतानाही हे अधिकारी डोंगरीमध्ये जात. दाऊदच्या गँगविरुद्ध काम करणाऱ्या टीमवर तुम्ही खिल्ली उडवत आहात. दुसरे अधिकारी का चांगलं काम करणार? कारण नंतर त्यांचीही खिल्ली उडवली जाणार आहे. मुद्दा बॉलिवूडवर लक्ष केंद्रित करण्याचा नाही, पण लोकांच्या कामावर टीका करणं चुकीचं आहे.”
Kapil Sharama Back! प्रोमोमध्ये दिसले चार अवतार, कृष्णा-कीकू आणि सुनीलचा तोच जुना अंदाज






