फोटो सौजन्य: Gemini
नुकताच नोव्हेंबर 2025 मधील कार सेल्स रिपोर्ट जाहीर झाला असून विविध सेगमेंटमध्ये अनेक मॉडेल्सने उत्तम कामगिरी केली आहे. या ताज्या विक्री आकडेवारीमुळे भारतीय ग्राहकांच्या पसंतीचा अंदाज पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, नोव्हेंबरमध्ये कोणत्या कंपनीची कोणती कार सर्वात जास्त लोकप्रिय होती?कोणत्या टॉप 5 कार भारतीयांच्या पसंतीस उतरल्या आहेत? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
Creta, Sierra चा मार्केट खाण्यासाठी नवीन Kia Seltos सज्ज! मिळणार अफलातून फीचर्स
अहवालांनुसार, टाटा नेक्सॉन ही टॉप 5 यादीत सर्वाधिक मागणी असलेली कार ठरली आहे. गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या 22,434 युनिट्स विकल्या गेल्या. कंपनीच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 46% वाढ झाली आहे.
मारुती कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये डिझायर ऑफर करते. कंपनीने गेल्या महिन्यात या कारच्या 21082 युनिट्स विकल्या, जे मागील वर्षीच्या तुलनेत 79% जास्त आहे.
मारुती सुझुकी हॅचबॅक सेगमेंटमध्ये स्विफ्ट ऑफर करते. या हॅचबॅकने गेल्या महिन्यात 19733 युनिट्स विकल्या. मागील वर्षीच्या तुलनेत या कारची विक्री 34% ने वाढली आहे.
Nexon की Victoris? कोण आहे सर्वात सुरक्षित? उत्तराखंडमधील ‘या’ Video मुळे सुरू झाला वाद
टाटाची लोकप्रिय एसयूव्ही पंच देशभरात मोठ्या प्रमाणात पसंत केली जाते. गेल्या महिन्यात या एसयूव्हीच्या 18,753 युनिट्सची विक्री झाली. वर्षभराच्या तुलनेत पंचच्या विक्रीत 21 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.
ह्युंदाईची लोकप्रिय एसयूव्ही क्रेटा देखील टॉप-सेलिंग मॉडेल्समध्ये कायम आहे. गेल्या महिन्यात क्रेटाच्या 17,344 युनिट्सची विक्री झाली. वर्षभराच्या तुलनेत या मॉडेलच्या विक्रीत 12 टक्क्यांची वाढ झाली आहे.






