सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल या रस्त्याचे काम उद्घाटन होऊनही गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही याकडे पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांकडून डोळेझाक होत असल्याने आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कामगार सेल जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे हे आपल्या अनुयायांसह कॉलेज कॉर्नर चौकामध्ये आमरण उपोषणास बसलेयत.दरम्यान उपोषण चालू केल्यानंतर काम सुरू करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी घेराव घालत त्यांना या कामाबाबत जाब विचारत हे काम लवकरात लवकर संपवू असे लेखी देण्यास आग्रह धरला. यावेळी संबंधित अधिकारी आणि नागरिक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली.