Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे ‘जेल भरो’ आंदोलन; शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Cockroach Janata Party : महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसरात कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली ‘जेल भरो आंदोलन’ करण्यात आले. कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली ‘जेल भरो आंदोलन’ करण्यात आले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 02, 2026 | 09:34 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टिका 
  • परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात 
  • न्यायालयाच्या हवाला देत परवानगी नाकारली
 

Cockroach Janata Party :  कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात आज 02 ऑक्टोबर 2026 रोजी म्हणजे; महात्मा गाँधी जयंतीच्या दिवशी मुंबई मधील छत्रपती शिवाजी पार्क दादार येथे आज आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी करण्यात आले. हे आंदोलन ‘जेल भरो आंदोलन’  पुकारण्यात आले. या आंदोलनामुळे आणि या आधी झालेला वाद पाहता छत्रपती शिवाजी पार्क मधील स्थानिक नागरिक, दुकानदार आणि परिसरातील व्यवस्थापन सदस्यांना खालील प्रमुख त्रासांना सामोरे जावे लागले आहे.

15 ते 20 जणांचा गट आंदोलनस्थळी दाखल झाला. त्यांच्याकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या त्यानंतर पोलिसांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी वेळीच मध्यस्थी करत घोषणाबाजी करणाऱ्या या गटाला आंदोलनस्थळापासून दूर घेऊन गेले.

Devendra Fadnavis: धारावी पुनर्विकास कसा असेल? घरांपासून उद्योगांच्या जागेपर्यंत सर्व काही एकाच छताखाली; ‘एक्सपिरियन्स सेंटर’ सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टिका

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टिका केली. “आज आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात. महात्मा गांधींना यापेक्षा मोठी श्रद्धांजली असू शकत नाही. इथे उपस्थित असलेला प्रत्येकजण हा गांधी आहे. आरएसएसच्या लोकांनी जितका त्रास महात्मा गांधींना दिला नाही. त्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला दिला आहे.पण गांधी मरत नाही. गांधी हे या देशाचा आत्मा आहेत. गोडसेसारखे हजारो येतील आणि हजारो जातील. पण या देशात महात्मा गांधींच्या विचाराने, त्याच्या मार्गाने चालणारे आहे. त्याच्या विचारानेच हा देश टिकला गेला आहे.

गोडसे विचारांच्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही महात्मा गांधीजींना कधीही संपवू शकत नाही. एक महामानव येतो आणि म्हणतो मी नॉन बायोलॉजिकल आहे, आम्हालाही कळतंय की तुम्ही मनु्ष्य असूच शकत नाही. ते स्वत:ला गांधी आणि नेहरुंपेक्षा मोठं करू पाहत आहे. पण ते या जन्मात काय पुढील सात जन्मातही शक्य नाही.

गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांची बरोबरी करण्याची तुमची पात्रता नाही. गांधीजी या देशाचा आत्मा आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचा कणा; जवाहरलाल नेहरू हे या देशाचे मन आहेत,” अशा शब्दांत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सरकारवर टिता केली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त जनतेला लुटाता येतं, त्यांच्याकडे देशाला देण्यासाठी काही नाही. नोटबंदी करून त्यांनी जनतेला रांगा लावायला लावल्या, कोरोनामध्ये लस घेण्यासाठी रांगा लावायला लावल्या आता मतदारयादीत नाव येण्यासाठीही रांग लावायला सांगत आहे. अशी टीकाही कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली आहे.

परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात

आंदोलनामुळे वाहतूककोंडीवर परिणाम होत आहे. तसेच छत्रपती शिवाजी पार्क परिसरातील रहदारीत अडथळा निर्माण होत आहे. या आंदोलनामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने परिसरात वाहतूककोंडी निर्माण झाली होती. परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले आणि नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध करण्यात आले. शिवाजी पार्क हा एक संवेदनशील आणि ‘शांतता क्षेत्र’ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वारंवार होणाऱ्या राजकीय आंदोलनांमुळे येथील शांतता भंग होत असते. अशी स्थानिकांची तक्रार आहे. तसेच परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यामुळे स्थानिक दुकानदारांच्या रोजवर परिणाम होत आहे. या परिसरातील होणाऱ्या गर्दीमुळे आणि गोंगाटा मुळे ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना याचा नाहक त्रास सहण करावा लागत आहे. त्याच बरोबर आपत्कालीन वाहनांच्या खास करुन रूग्णवाहिका येण्या-जाण्यास त्रास होत आहे.

न्यायालयाच्या हवाला देत परवानगी नाकारली

मुंबई पोलिसांनी 2013 च्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली होती. तरी सुध्दा कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्र जमल्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Prakash Ambedkar : ‘सरकारचे परराष्ट्र धोरण अमेरिकेसमोर सरेंडर,’ प्रकाश आंबेडकरांचा घणाघात, मुंबईत वंचितकडून इराणच्या समर्थनार्थ जन

Web Title: Cockroach janata party protest mumbai abhijit dipke pm modi rss sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • BJP
  • CJP Protest
  • Shivaji Park

संबंधित बातम्या

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
1

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा

CJP Protest Shivaji Park Live: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कवर तरुणांचा लोंढा; दादरमध्ये तणाव
2

CJP Protest Shivaji Park Live: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कवर तरुणांचा लोंढा; दादरमध्ये तणाव

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत  ‘युवा निर्धार मेळावा’
3

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत ‘युवा निर्धार मेळावा’

MUMBAI : शिवाजी पार्कात आंदोलन नको, आझाद मैदानात जा; CJPच्या आंदोलनाला स्थानिकांचा विरोध
4

MUMBAI : शिवाजी पार्कात आंदोलन नको, आझाद मैदानात जा; CJPच्या आंदोलनाला स्थानिकांचा विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.