Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाच्या कामामुळे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबरदरम्यान CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार असून, यामुळे काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासावर परिणाम होणार आ

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 30, 2026 | 10:24 AM
CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

Follow Us
Follow Us:
  • CSMTचे प्लॅटफॉर्म १४ आणि १५ तब्बल ७५ दिवस बंद राहणार आहे
  • सात मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादरमध्येच संपणार  आहे
  • मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यातच थांबणार तर यामुळे प्रवाशांना पुढील प्रवासाची व्यवस्था करावी लागणार आहे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकासाच्या कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेब्लिंग लाइन १५ वर ७५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत हा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या आठ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर किंवा ठाणे स्थानकातच संपविण्यात येणार आहे. या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेब्लिंग लाइन १५ वर पायाभरणी आणि इतर आवश्यक कामे केली जाणार आहेत. काम पूर्ण होईपर्यंत या प्लॅटफॉर्मवरून रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर हे प्लॅटफॉर्म रेल्वे वाहतुकीसाठी पुन्हा उपलब्ध करून देण्यात येतील.

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

दादर स्थानकामध्ये सात गाड्यांचा प्रवास संपणार

११००२ बल्लारशाह-सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस, १२८१० हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस, १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस, ११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, २२१४४ बिदर-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि २२१०८ लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेस या सात गाठ्यांचा प्रवास दादर स्थानकातच संपविण्यात येणार आहे.

ठाण्यातून पुढील प्रवासाची व्यवस्था करावी लागणार

१२१३४ मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेसचा प्रवास ठाणे स्थानकातच संपविण्यात येणार आहे. त्यामुळे या गाडीने सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे येथून पुढील प्रवासाची पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

पुनर्विकासाच्या पुढील टप्ण्प्यासाठी ब्लॉक

आणि सीएसएमटी पुनर्विकासाच्या पहिल्या टप्यात यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ वर ब्लॉक घेण्यात आला होता. आता पुढील कामांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर ब्लॉक घेण्यात येत आहे. पायाभूत सुविधांचा विकास आधुनिकीकरणाच्या दृष्टीने हे काम आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Csmt 75 day block october 1 december 15 platform 14 15 8 express trains dadar thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Central Railway Mega Block
  • Local train Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले
1

Mumbai News: मुंबईतील कॉलराचा इतिहास उलगडणार! महानगरपालिकेचे दीडशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज खुले

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
2

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
3

‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास
4

Mumbai News: सचिन वाझेंच्या जामिनावर कोर्टाचा निर्णय; अँटिलिया प्रकरणातील साडेपाच वर्षांचा कारावास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.