Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘योग गुरु’!; वरळीत रंगला ‘दिव्याज फाउंडेशन’चा भव्य योगोत्सव

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुंबईच्या वरळीत 'दिव्याज फाउंडेशन'तर्फे भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील 'योग गुरु' म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 21, 2026 | 02:56 PM
'देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील 'योग गुरु'! (Photo Credit- X)

'देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील 'योग गुरु'! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘योग गुरु’!
  • वरळीत रंगला ‘दिव्याज फाउंडेशन’चा भव्य योगोत्सव
मुंबई, दि. २१ जून २०२६ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दिव्याज फाउंडेशनतर्फे डोम, एसव्हीपी स्टेडियम, एनएससीआय, वरळी येथे भव्य योग आणि ध्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात दिव्याज फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या भावनेची आठवण करून दिली. “माझ्या आयुष्यातील लेडी लक म्हणजे माझी लाडकी मुलगी दिविजा,” या मुख्यमंत्र्यांच्या विधानातून व्यक्त होणारा जिव्हाळा आणि कुटुंबीय मूल्यांचा लोढा यांनी विशेष उल्लेख केला. त्या मूल्यांनाच अधोरेखित करत सौ. अमृता फडणवीस जी यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या दिव्याज फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी विविध क्षेत्रांत व्यापक व सातत्यपूर्ण कार्य राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दिव्याज फाउंडेशनच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, स्वच्छता अभियान आणि आर्थिक स्वावलंबन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने कार्य करण्यात येत आहे. समाजसेवा, क्रीडा, संगीत, योग आणि कौशल्य विकास यांचा समन्वय साधत सर्वांगीण विकासाचा आदर्श या संस्थेने उभा केला आहे.

योग : भारताचा प्राचीन, समृद्ध आणि गौरवशाली वारसा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जुहू बीच, मुंबई येथे 12व्या भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ‘योगा ऑन द बीच’ कार्यक्रम संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, योग ही भारताची अत्यंत… pic.twitter.com/aX8vagzQeN — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 21, 2026


यावर्षीच्या योग दिनाच्या कार्यक्रमात विशेषतः आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील ७०० हून अधिक मुलांना सहभागी करून घेत, त्यांना सकारात्मकता, आत्मविश्वास आणि नव्या आयुष्याची दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

चिमुकल्या विद्यार्थीनी पत्रकारासमोर गोंधळले CM फडणवीस; म्हणाले सोपे प्रश्न विचारा बरं का.., मुलाखतीचा VIDEO व्हायरल

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “योग म्हणजे केवळ एक व्यायाम किंवा कार्यक्रम नाही, तर ती एक साधना आहे जी शरीर, मन आणि भविष्यास एकत्र जोडते. भारताने जगाला दिलेली ही अमूल्य परंपरा आज जागतिक स्तरावर पोहोचली आहे, आणि याचे सर्वात मोठे श्रेय देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांना जाते. त्यांच्या पुढाकारामुळे योगाला जागतिक मान्यता मिळाली आणि भारताची सांस्कृतिक ओळख अधिक बळकट झाली आहे.”

ते पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘योग गुरु’ आहेत. त्यांनी राज्यात संतुलित आणि दूरदृष्टीने नेतृत्व करत विकासाचा मार्ग कायम ठेवला आहे. योगाच्या तत्वज्ञानाप्रमाणेच त्यांनीही राज्याच्या प्रगतीत संतुलन साधत महाराष्ट्राला पुढे नेले आहे.”

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. योग, ध्यान आणि प्रबोधनात्मक उपक्रमांद्वारे सर्वांनी निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल दिव्याज फाउंडेशनच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. विकसित महाराष्ट्राच्या दिशेने अशा उपक्रमांची निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

शेतकरी कर्जमाफीत फक्त एकच अट ! मुख्यमंत्री फडणवीसांनी केला खुलासा…

Web Title: Devendra fadnavis is the yoga guru of maharashtras politics divyaj foundations grand yoga festival held in worli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • international yoga day

संबंधित बातम्या

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
1

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…
2

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
3

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

खड्ड्यांचे साम्राज्य अन् ट्रॅफिकचा फास, चाकणमधून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार? हजारो जणांचे रोजगार धोक्यात
4

खड्ड्यांचे साम्राज्य अन् ट्रॅफिकचा फास, चाकणमधून 20 कंपन्या गाशा गुंडाळणार? हजारो जणांचे रोजगार धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.