चिमुकल्या विद्यार्थीनी पत्रकारासमोर गोंधळले CM फडणवीस; म्हणाले सोपे प्रश्न विचारा बरं का.., मुलाखतीचा VIDEO व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
झोपेच्या नादात काकांच करोडोंचं नुकसान झालं, दुकानातील धक्कादायक घटना कॅमेरात कैद; Video Viral
सुरुवातीला विद्यार्थीनी अत्यंत आत्मविश्वासाने फडणवीसांचे स्वागत केले. त्यांनी हसत हसत सोपे प्रश्न विचारा बरं का अशी विनवणी केली. मुलीने त्यांचे पूर्ण नाव विचारल्यावर त्यांनी देवेंद्र सविता चंद्रराव फडणवीस असे संपूर्ण नाव सांगितले. विद्यार्थीनीने त्यांच्या यशस्वी प्रवासाबद्दलही प्रश्न केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात एका आंदोलनातून झाल्याचे म्हटले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवताना त्यांनी सामाजिक कार्याला सुरुववात केल्याचे सांगितले.
सामाजिक कार्य करताना येणाऱ्या अडचणींवर मात करायची असेल तर प्राथमिक व्यवस्थेशी झगडावे लागते, असे ते म्हणाले. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते आदर्श मानतात. काम योग्य असेल तर संघर्षानंतरही यश मिळते असे त्यांनी चिमुकलीला समजावले. मुलीने त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील चांगल्या आठवणींबाबत विचारले, यावेळी त्यांनी तू घेतलेली मुलाखत नक्कीच आठणीत राहिल असे त्यांनी म्हटले. शेवटी त्यांनी डिजिटल शिक्षणाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शाळेत नवीन सुरु झालेल्या डिजिटल लॅबचा फायदा घेण्याचे आवाहन केले.
आतापर्यंतची सर्वात गोड, सुंदर आणि हृदयाला स्पर्श करणारी मुलाखत… ❤️@Dev_Fadnavis #DevendraFadnavis | #DevendraFadnavisInterview pic.twitter.com/TVDw8MV7Uu — Dr. Nitesh Rajhans Singh (@niteshsingh_bjp) June 15, 2026
सध्या ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अनेकांनी विद्यार्थीनीचे कौतुक केले आहे. भविष्यात ही चिमुकली नक्कीच पत्रकार होणार असे काहींनी म्हटले आहे. हा गोड व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @niteshsingh_bjp या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






