Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video : धावत्या लोकलच्या दारात लटकणाऱ्या महिलेचा थरार; पुलाच्या खांबाला साडी अडकली अन्…, रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

Mumbai Local News : दिवा–सीएसएमटी लोकलच्या दारात लटकून प्रवास करणाऱ्या महिलेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धावत्या लोकलमध्ये तिची साडी रेल्वे पुलाच्या खांबाला घासल्याने काही क्षणांसाठी जीव धोक्यात आला. या घटनेनंतर रेल्वे सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 20, 2026 | 05:53 PM
धावत्या लोकलच्या दारात लटकणाऱ्या महिलेचा थरार; पुलाच्या खांबाला साडी अडकली अन्..., रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित (फोटो सौजन्य-ChatGPT)

धावत्या लोकलच्या दारात लटकणाऱ्या महिलेचा थरार; पुलाच्या खांबाला साडी अडकली अन्..., रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • धावत्या लोकलच्या दारात लटकणाऱ्या महिलेचा थरार
  • पुलाच्या खांबाला साडी अडकली
  • रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित
Mumbai Local Viral Video News Marathi : मुंबईच्या जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये गर्दीमुळे जीव धोक्यात घालून प्रवास करण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच दिवा–सीएसएमटी लोकलमधील एका महिलेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये संबंधित महिला धावत्या लोकलच्या दारात लटकून प्रवास करताना दिसते. याचवेळी तिची साडी रेल्वे पुलाच्या खांबाला घासते, त्यामुळे काही क्षणांसाठी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण होते. काही सेकंदांचा फरक पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने महिला बचावली आणि अनर्थ टळला.

Mumbai News: लोकल प्रवासावर हिंसाचाराचे सावट! किरकोळ संभाषणही सहन होईना, समाज पोहोचला ‘टिपिंग पॉइंट’ वर

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रेल्वे प्रशासनाने वारंवार लोकलच्या दारात उभे राहून किंवा लटकून प्रवास करू नये, असे आवाहन केले आहे. मात्र गर्दीमुळे अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करण्यास मजबूर असल्याची भावना प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.

विशेषतः सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकलमधून पडून मृत्यू किंवा गंभीर जखमी होण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे लोकल फेऱ्या वाढवणे, गर्दी कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलणे, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. हा व्हायरल व्हिडिओ रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांसाठी गंभीर इशारा मानला जात आहे.

याआधी चर्चगेट ते नालासोपारा दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय मयंक लोहारची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. अंधेरी आणि बोरिवली स्टेशनच्या दरम्यान, मयंक आणि आरोपी रोशन सुवर्णा यांच्यात ट्रेनचा दरवाजा उघडा ठेवण्यावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि सहप्रवाशांनी मारहाण केल्यानंतर, रोशनने आपल्या बॅगेतून एक धारदार शस्त्र काढून मयंकवर प्राणघातक हल्ला केला. शताब्दी रुग्णालयात मयंकला मृत घोषित करण्यात आले. बोरिवली जीआरपीने आरोपीला अटक केली आहे. पीडित कुटुंब आता आरोपीला फाशीची शिक्षा आणि कुटुंबाच्या पुनर्वसनाची मागणी करत आहे.

सीटच्या वादातून कड्याने प्राणघातक हल्ला

तसेच बुधवारी रात्री सुमारे १२:०० वाजता, परळ ते अंबरनाथ दरम्यान धावणाऱ्या लोकल ट्रेनच्या जनरल डब्यात दोन प्रवाशांमध्ये सीटवरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि एका व्यक्तीने दुसऱ्या प्रवाशावर जड धातूच्या ब्रेसलेटने हल्ला केला. या हल्ल्यात एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) स्वप्निल नीला यांनी स्पष्ट केले आहे की, धारदार शस्त्राने हल्ला झाल्याच्या सोशल मीडियावरील बातम्या खोट्या आहेत. हा हल्ला केवळ एका ब्रेसलेटने करण्यात आला असून, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai News: तिकीट तपासताना कोणतेही गैरवर्तन नाही! अंधेरी एसी लोकलमधील वादावर पश्चिम रेल्वेचे स्पष्टीकरण

Web Title: Diva csmt local woman hanging at door narrow escape viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Mumbai Local
  • railway
  • viral video

संबंधित बातम्या

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video
1

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video

संतापजनक! स्टेजवर डान्स करत असतानात नराधमांनी तरुणीला नेलं ओढत; पुढं जे घडलं पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL
2

संतापजनक! स्टेजवर डान्स करत असतानात नराधमांनी तरुणीला नेलं ओढत; पुढं जे घडलं पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL

पालकांनो वेळीच सावध व्हा! मोबाईलसाठी पोटच्या मुलानेच आईला घातल्या बुक्क्या? VIDEO पाहून नेटकरी संतप्त
3

पालकांनो वेळीच सावध व्हा! मोबाईलसाठी पोटच्या मुलानेच आईला घातल्या बुक्क्या? VIDEO पाहून नेटकरी संतप्त

क्रूरता की न्याय? धावत्या ट्रेनमधून चोराला पळणाऱ्या चोराला प्रवाशाने मारली लाथ; VIDEO व्हायरल होताच प्रवाशाला अटक
4

क्रूरता की न्याय? धावत्या ट्रेनमधून चोराला पळणाऱ्या चोराला प्रवाशाने मारली लाथ; VIDEO व्हायरल होताच प्रवाशाला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.