Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DNA आधारित उपचारांची नवी पहाट! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अँटिबायोटिक उपचार पद्धतीत बदलाची चिन्हे

आयआयटी मुंबईच्या संशोधनातून डीएनए आधारित उपचार पद्धती विकसित होत असून, भविष्यात अँटिबायोटिक उपचारांमध्ये मोठे बदल घडू शकतात. या पार्श्वभूमीवर डीएनए-आधारित ‘अ‍ॅप्टामर’ तंत्रज्ञानाकडे संशोधकांनी आशेने पाहण्यास सुरुवात केल

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 28, 2026 | 06:23 PM
DNA आधारित उपचारांची नवी पहाट! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अँटिबायोटिक उपचार पद्धतीत बदलाची चिन्हे

DNA आधारित उपचारांची नवी पहाट! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अँटिबायोटिक उपचार पद्धतीत बदलाची चिन्हे

Follow Us
Follow Us:

राम खांदारे , मुंबई : संसर्गजन्य आजारांवरील उपचार पद्धतीत मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले डीएनए-आधारित तंत्रज्ञान नवीन क्रांती घडविण्यास सज्ज झाले आहे. आयआयटी मुंबई येथील संशोधकांनी विकसित केलेली ही पद्धत पारंपरिक अँटिबायोटिक्सना पूरक ठरत असून भविष्यातील उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. न्यूमोनिया, क्षयरोग, मूत्रमार्गातील संसर्ग तसेच रक्तातील संसर्ग अशा विविध आजारांवर अँटिबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र, वाढत्या अँटिबायोटिक रेसिस्टन्समुळे उपचार अधिक कठीण होत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर डीएनए-आधारित ‘अ‍ॅप्टामर’ तंत्रज्ञानाकडे संशोधकांनी आशेने पाहण्यास सुरुवात केली आहे.

“माघार घ्या, नाहीतर सरकारी रोष सहन करा!” इंडियन मेडिकल असोसिएशन माजी अध्यक्ष व सभासदांनी तयार केलेल्या पॅनलमधील उमेदवारांना धमकी

या संशोधनात डीएनएच्या लहान साखळ्यांचा वापर करून जीवाणूंनी तयार केलेल्या प्रतिकारक विकरांना निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे अँटिबायोटिक्सना पुन्हा प्रभावीपणे कार्य करता येते. विशेष म्हणजे, या डीएनए अ‍ॅप्टामर्सना ‘लिपोसोम’ नावाच्या सूक्ष्म संरचनेत बंदिस्त करून ते थेट जीवाणूंमध्ये पोहोचवण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ दिसून आली. डीएनए-आधारित उपचार ही केवळ प्रयोगशाळेतील संकल्पना राहिलेली नसून योग्य पद्धतीने वापरल्यास ती भविष्यातील उपचारपद्धतीचा महत्त्वाचा भाग ठरण्याची शक्यता प्रा. रुची आनंद यांनी व्यक्त केली.

यात प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये या तंत्रज्ञानामुळे प्रतिरोधक जीवाणूंवर अँटिबायोटिक्सचा परिणाम अधिक प्रभावी झाल्याचे दिसून आले. विशेषतः स्टॅफिलोकोकस ऑरियस सारख्या जीवाणूंवर सकारात्मक परिणाम नोंदवण्यात आला आहे. तज्ञांच्या मते, ही पद्धत भविष्यात वैयक्तिक उपचारांसाठीही उपयुक्त ठरू शकते. मात्र, यासाठी प्राण्यांवरील आणि मानवी चाचण्यांची आवश्यकता आहे. या संशोधनात लीना बडगुजर, दामिनी साहू, स्वागता पात्रा यांनीहि सहभाग घेतला.

‘नवीन औषधे विकसित करण्याऐवजी सध्याच्या औषधांना अधिक प्रभावी बनवणे हे डीएनए आधारित तंत्रज्ञान अधिक व्यावहारिक आणि जलद मार्ग ठरू शकतो.’आयआयटी मुंबई, केमिस्ट्री डिपार्टमेंट, प्रा. पी. आय. प्रदीपकुमार यांनी माहिती दिली.

*डीएनए अ‍ॅप्टामर्सद्वारे जीवाणूंची प्रतिकारशक्ती कमी करण्याचा प्रयत्न
*लिपोसोम तंत्रज्ञानामुळे औषध पोहोचवण्याची कार्यक्षमता वाढली
*अँटिबायोटिक रेसिस्टन्सवर मात करण्यासाठी नवी दिशा
*भविष्यात पर्सनलाइज्ड उपचार शक्य होण्याची शक्यता
*अजून क्लिनिकल चाचण्या बाकी, पण प्राथमिक निष्कर्ष उत्साहवर्धक

Mumbai Local: मध्य रेल्वेवरील गर्दी कमी होणार! आता ठाणे-डोंबिवली मार्गावरून धावणार 15 डब्यांची लोकल

Web Title: Dna based therapy iit bombay research antibiotic treatment breakthrough

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • health
  • IIT Bombay
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ
1

Mulund Fire: मुलुंडमध्ये आगीचा भडका! पीएपी इमारत प्रकल्पाला भीषण आग, स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने परिसरात खळबळ

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
2

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
3

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
4

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.