Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवलीकरांसाठी दिलासादायक बातमी! मोठा गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

डोंबिवलीतील मोठा गणेश घाट परिसराच्या विकासाला आता वेग मिळत आहे. घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासोबतच रो-रो जलवाहतूक प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्याकडे जात असून, नागरिकांना लवकरच सुरक्षित आणि जलद प्रवासाची सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 02, 2026 | 01:46 PM
डोंबिवलीकरांसाठी दिलासादायक बातमी! मोठा गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

डोंबिवलीकरांसाठी दिलासादायक बातमी! मोठा गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

Follow Us
Follow Us:
  • डोंबिवलीतील मोठा गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
  • मोठागाव जेटीवरील पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण होत असून डिसेंबरपर्यंत रो-रो जलवाहतूक सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
  • रो-रो सेवेमुळे ठाणे, वसई-विरार आणि पुढील टप्प्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
डोंबिवलीतील मोठा गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. या रस्त्यामुळे मोठा गणेश घाट परिसरातील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार असून, घाट परिसराचा विकासही वेगाने होणार आहे. दरम्यान, मोठा गाव येथील घाटावर जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठीही आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे.

Amravati News: अमरावतीच्या विकासाला नवी गती! बेलोरा विमानतळ ठरणार विदर्भातील नवे एव्हिएशन हब

प्रशासनाच्या नियोजनानुसार डिसेंबरपर्यंत जलवाहतूक सेवा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ही जलवाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर डोंबिवली आणि परिसरातील नागरिकांना ठाणे तसेच वसई-विरार येथे जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. याशिवाय, दुसऱ्या टप्प्यात ही सेवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत विस्तारण्याचेही नियोजन करण्यात आले असून, त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे म्हणाले की, मोठा गाव हे डोंबिवलीतील सर्वात मोठं गणेशघाट आहे. या गणेशघाटावर सार्वजनिक गणपती विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असतं. गणेशघाटावर जाणारा रस्ता अनेक वर्षांपासून जागेच्या अडचणीमुळे काँक्रीटीकरण होऊ शकला नव्हता. पण आता जागेची अडचण दूर झाली आहे. त्या जागेचे आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन झालेले आहे. लवकरच ते काम पूर्ण होईल आणि गणपती विसर्जनाच्या वेळेला जे गणेश भक्त येतात त्यांच्यासाठी हे काम दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा आहे.

त्यांनी पुढे सांगितलं की, मोठा गावमध्ये याच रस्त्यालगत असलेली जी जेटी आहे, येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रोरो जेटीचे काम सुरु आहे. वॉटर ट्रासंंपोर्टचे काम प्रगतीपथावर आहे आणि येत्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होऊन येथून रोरो सर्विस लोकांसाठी सुरु होईल अशी अपेक्षा आहे. त्याची पाहणी आज रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. 70 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित 30 टक्के काम देखील लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; ‘या’ जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबई-ठाण्याला यलो अलर्टचा इशारा

म्हात्रे म्हणाले की, रोरोचे दोन मार्ग तयार करण्यात आले आहेत. एक मार्ग मोठागावापासून सुरु होणार आहे. हा मार्ग मोठागाव-ठाणे-वसई-विरार-मिरा-भाईंदर असा असणार आहे. तर दुसरा मार्गमोठागावपासून नवी मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टपर्यंत जातो. ही सर्व काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहेत. लोकांचा विश्वास आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यामातून होत असलेली कामं यावर विश्वास ठेऊन पक्षात प्रवेश केला जात आहे.

Web Title: Dombivli motha ganesh ghat road concretisation work begins roro water transport update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Dombivali
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
1

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
2

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
3

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
4

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.