Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrikant Shinde : मतदार यादी पुनरिक्षण आणि निवडणूक तयारीसाठी श्रीकांत शिंदे खान्देशात; ‘शिवसंवाद दौऱ्याचा’ चौथा टप्पा

मतदार यादी पुनरिक्षण मोहीम आणि आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे 5 आणि 6 जून रोजी दोन दिवसीय खान्देश दौऱ्यावर येणार आहेत. ‘शिवसंवाद दौऱ्या’च्या चौथ्या टप्प्यात ते नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील 19 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 04, 2026 | 05:52 PM
मतदार यादी पुनरिक्षण आणि निवडणूक तयारीसाठी श्रीकांत शिंदे खान्देशात; ‘शिवसंवाद दौऱ्याचा’ चौथा टप्पा

मतदार यादी पुनरिक्षण आणि निवडणूक तयारीसाठी श्रीकांत शिंदे खान्देशात; ‘शिवसंवाद दौऱ्याचा’ चौथा टप्पा

Follow Us
Follow Us:
  • शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा खान्देशात शिवसंवाद दौरा
  • नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील १९ विधानसभा मतदार संघाचा आढावा
  • मराठवाड्यानंतर खासदार डॉ. शिंदे यांच्या खान्देशात बैठकांचा धडाका
मुंबई : मतदार यादी पुनरिक्षण मोहीम आणि आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे दोन दिवसांच्या खान्देश दौऱ्यावर येणार आहेत. ५ आणि ६ जून रोजी खासदार डॉ. शिंदे यांचा शिवसंवाद दौरा खान्देशात होणार असून यात नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील १९ विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यासाठी खासदार डॉ. शिंदेंसोबत नंदुरबार आणि जळगाव जिल्हा संपर्क मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादाजी भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी व राज्य संघटन प्रमुख माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित राहणार आहेत.

मराठवाडा शिवसेनेचा बालेकिल्ला, संघटना मजबूत करणार, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ‘शिवसंवाद दौऱ्याचा चौथा टप्पा आहे. नुकताच त्यांनी मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांचा दौरा केला होता. आता खासदार डॉ. शिंदे ५ व ६ जून रोजी खान्देशात येणार आहेत. शुक्रवारी ५ जून रोजी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे सकाळी १०.०० वाजता अक्कलकुवा, शहादा या मतदार संघाची आढावा बैठक होईल. दुपारी १.०० वाजता नंदुरबार येथे नवापूर व नंदुरबार विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतील. संध्याकाळी ५.०० वाजता धुळ्यामध्ये साक्री, शिंदखेडा, शिरपूर, धुळे ग्रामीण, धुळे शहर या मतदार संघांचा खासदार डॉ. शिंदे आढावा घेणार आहेत. यानंतर रात्री जळगाव येथे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला खासदार डॉ. शिंदे उपस्थित राहणार आहेत.

शिवसंवाद दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी ६ जून रोजी सकाळी १०.०० वाजता चाळीसगाव येथे पाचोरा, एरंडोल आणि चाळीसगाव या विधानसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहेत. दुपारी २.३० वाजता अमळनेर येथे चोपडा, जळगाव ग्रामीण आणि अमळनेर या मतदार संघांचा आढावा घेणार आहेत. संध्याकाळी ७.०० वाजता मुक्ताईनगर येथे रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ आणि जामनेर या विधानसभा मतदार संघांचा आढावा घेण्यात येईल, असे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

खान्देशनंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाचा होणार दौरा

राज्यात १०० विधानसभा, २२ जिल्ह्यांत खासदार डॉ. शिंदेंचा ‘शिवसंवाद दौरा’ होणार आहेत. यावेळी आढावा बैठकांमध्ये एसआयआर मोहीम, बूथ लेव्हल एजंट्स नियुक्तींबाबत खासदार डॉ. शिंदे मार्गदर्शन करतील. या बैठकीत कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींशी खासदार डॉ. शिंदे थेट संवाद साधतील. खान्देशनंतर खासदार डॉ. शिंदे यांचा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात शिवसंवाद दौरा होणार आहे.

Shivsena News : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेनेची मोठी तयारी; राज्यात सव्वा लाखांहून अधिक BLA नियुक्त

Web Title: Dr shrikant shinde khandesh shivsamvad tour election review june 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Shiv Sena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
1

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
2

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
3

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल
4

KDMC Politics: ‘भाजपकडे नैतिक मूल्ये उरलेली नाहीत’; KDMCतील शिवसेना-भाजप वादावर महेश तपासेंचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.