मुंबईकरांसाठी ऐतिहासिक क्षण! नवी मुंबई विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडींग झालं. विमानाच्या लँडींगवेळी, अग्निशमन दलाकडून पहिल्या विमानाला वॉटर सलामीही देण्यात आली. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईत उभारण्यात आलेलं हे विमानतळ पुढील वर्षी म्हणजेच मार्च 2025 रोजी पर्यंत सुरू करण्यात येणार आहे. विमानतळाला दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून लवकरच केंद्र सरकारकडूनही त्यास मान्यता मिळणार आहे.
नवी मुंबई विमानतळावर आज 29 डिसेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास पहिलं व्यावसायिक विमान इंडिगो A-320 चं यशस्वी लँडिंग करण्यात आलं. महिनाभरापूर्वी वायुदलाच्या सी 295 आणि सुखोई 30 ही विमानं धावपट्टीवर उतवरण्यात आली होती. या विमानांचे लँडींग यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं आहे.हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवीन मुंबई विमानतळ देशातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ आहे. जवळपास 5,945 एकर जागेवर मुंबईपासून 40 किमी अंतरावर पनवेलजवळ हे विमानतळ उभारण्यात आलं आहे.
#WATCH | Maharashtra: Navi Mumbai International Airport successfully conducts first flight validation test.
Water cannon salute was given to an Indigo Airlines A320 aircraft which landed successfully. pic.twitter.com/zEKbpRdKrT
— ANI (@ANI) December 29, 2024
मुंबईच्या सध्याच्या विमानतळामुळे प्रवासी आणि मालवाहतूक भार कमी होईल,
आर्थिक विकास, स्थानिक उद्योग, व्यापार आणि स्थावर मालमत्तेला चालना मिळेल बांधकामामुळे रोजगाराच्या संधींना गती मिळेल,
या विमानतळामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांशी चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल.
नवी मुंबईसारख्या भागात पायाभूत सुविधांचा विकास होईल.
मुंबईतील मुख्य भागांवरील लोकसंख्येचा ताण कमी होईल.
कझाकिस्तान विमान अपघातावर पुतिन यांनी मागितली माफी; म्हणाले, ‘हा अपघात रशियाने….’
NMIA चे धोरणात्मक स्थान हे भारतातील सर्वात प्रमुख भविष्यातील हवाई वाहतूक केंद्रांपैकी एक बनवते. हे महाराष्ट्र आणि पश्चिम भारत दोन्हीसाठी प्रवेशद्वार म्हणून काम करेल. NMIAL ची रचना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केली गेली आहे. यात अत्याधुनिक सुविधा आहेत, ज्यात मोठी व्यावसायिक विमाने हाताळण्यास सक्षम 3,700 मीटर धावपट्टी, आधुनिक प्रवासी टर्मिनल आणि प्रगत हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली यांचा समावेश आहे.