दक्षिण कोरियातील विमान अपघातात १७९ प्रवाशांचा मृत्यू; अपघाताचं कारणही आलं समोर
दक्षिण कोरियामध्ये रविवारी भीषण विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनतेत आतापर्यंत १८१ प्रवाशांपैकी १७९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मुआन (Muan) आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना लँडिंग गियर खराब झाल्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरलं आणि समोरच्या भिंतीला धडक दिली. त्यानंतर मोठा स्फोट झाला. १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्सना घेऊन बँकॉकहून आलेले जेजू एअर फ्लाइट 7C2216 हे विमान सकाळी नऊच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) लँडिंग करत होतं.
अमेरिकेच्या ‘या’ धमकीमुळे घाबरले सौदी अरेबिया; BRICS मध्ये सामील होण्याचा निर्णय स्थगित
मात्र स्थानिक अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी पक्ष्यांची धडक बसल्याने आणि प्रतिकूल हवामान हे या अपघाताचे कारण असल्याचे सांगितले. या अपघाताचे कारण पक्षांची धडक आणि खराब हवामान असावे असा अंदाज आहे. पण नेमके कारण काय होते हे चौकशीनंतर समोर येईल, अशी माहिती मुआन फायर स्टेशनचे प्रमुख ली, जेऑंग-ह्यून यांनी दिल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. मात्र या दुर्घटनेबद्दल अधिकृत माहिती मिळणे अद्याप बाकी आहे.
#BREAKING An Image from the Crash Site of Jeju Air Flight 2216 at Muan International Airport in South Korea, showing the Tail of the Aircraft engulfed in Flame@fastnewsnet pic.twitter.com/PBNOEyx0DW
— Abdul khabir jamily (@JamilKhabir396) December 29, 2024
योनहॅप न्यूज एजन्सीने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, विमानातील दोन प्रवासी वाचले आहेत. तर इतर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत 120 मृतदेह बाहेर काढले आहेत.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये विमान धावपट्टीवरून घसरताना आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना दिसत आहे. स्थानिक माध्यमांच्या मते, विमानाने पक्ष्यांच्या कळपाला धडक दिली, ज्यामुळे त्याचे लँडिंग गियर खराब झाले.
विमानाच्या लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याने विमानाचे क्रॅश लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला असे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे. लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसर्या प्रयत्नादरम्यान हा अपघात झाला. धावपट्टी संपेपर्यंत विमानाची गती कमी करण्यात यश आले नाही त्यामुळे विमानतळाच्या टोकाला असलेल्या भिंतीवर विमान आदळले आणि त्याने पेट घेतला असेही त्यांनी सांगितले.
कझाकीस्तानमध्ये मध्ये प्रवासी विमानाला मोठा अपघात झाला होता. अकाटू शहराच्या जवळ या प्रवासी विमानाला भीषण अपघात झाला होता. समुद्रकिनाऱ्याजवळ हे विमान कोसळलं. याचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या विमानातून 67 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ३७ नागरिकांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. तर ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. अजरबैजान एअरलाइन्सचं हे विमान लँड करताना कोसळलं होतं. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.