Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील गणेशभक्तांचा प्रवास सुलभ करण्यासाठी मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्याचे तसेच लोकल रेल्वे वाहतुकीवर मेगाब्लॉकचा परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 22, 2026 | 06:13 PM
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; गणेशोत्सवात लोकलच्या मेगाब्लॉकला ‘ब्रेक’

Follow Us
Follow Us:
  • गणपती दर्शनासाठी प्रवास होणार सोपा!
  • मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या
  • लोकल सेवा सुरळीत ठेवण्याचे निर्देश
मुंबई : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2026) काळात मुंबई आणि उपनगरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने मुंबई मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ आणि रेल्वेवरील मेगाब्लॉक घेऊ नका, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. भाविकांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि अडथळामुक्त व्हावा, यासाठी रात्री उशिरापर्यंत, तसेच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्याच्या सूचना मेट्रो प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर नियमित मेगा ब्लॉक तसेच रात्रकालीन ब्लॉक घेऊ नये, असे निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले.

मेट्रो आणि लोकल रेल्वेचा वापर

गणेशोत्सवात मुंबईसह उपनगरांतील विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मेट्रो आणि लोकल रेल्वेचा वापर करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मेट्रोच्या दोन फेऱ्यांमधील अंतर अर्थात ‘हेडवे’ कमी करून अधिक फेऱ्या चालविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळेत मेट्रोची शेवटची फेरी उशिरापर्यंत सुरू ठेवून भाविकांसाठी विशेष फेऱ्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही सांगण्यात आले आहे.

Mumbai Local: मुंबई लोकलला पुन्हा ब्रेक! मुलुंडमध्ये ओव्हरहेड वायरवर साहित्य पडून आग; १५ ते २० मिनिटांचा विलंब

गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांवर प्रवाशांचा मोठा ताण येण्याची शक्यता आहे. दिवस-रात्र रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होणार असल्याने गणेशोत्सवाच्या प्रारंभापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर नियमित मेगा ब्लॉक किंवा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येऊ नये, असे निर्देश मंत्री लोढा यांनी दिले आहेत.

उपनगरीय विशेष लोकल फेऱ्या

गर्दीच्या काळात आणि रात्री गणेश दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांसाठी अतिरिक्त उपनगरीय विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात याव्यात. प्रमुख रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे सुरक्षा बल (RPF) तसेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तैनात करून प्रवाशांच्या सुरक्षेसह गर्दी व्यवस्थापनाची प्रभावी व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

भाविकांना तिकीट काढताना अडचणी येऊ नयेत, यासाठी मेट्रोवरील सर्व तिकीट काऊंटर, ऑटोमेटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (ATVM), डिजिटल तसेच क्यूआर तिकीट प्रणाली मेट्रोची शेवटची फेरी होईपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकांवरील लिफ्ट, एस्केलेटर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्राथमिक उपचार केंद्रे सेवा सुरू असेपर्यंत उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

प्रमुख आणि गर्दीच्या मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा रक्षक तसेच क्राऊड मॅनेजमेंट कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये होणारे बदल, वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवश्यक माहिती स्थानकांवरील डिस्प्ले बोर्ड, उद्घोषणा यंत्रणा तसेच अधिकृत सोशल मीडिया माध्यमांद्वारे वेळोवेळी प्रसारित करण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

“गणेशोत्सव हा मुंबईकरांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा मोठा सण आहे. या काळात लाखो भाविक गणेश दर्शनासाठी रेल्वे, मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. त्यामुळे भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत व वेळेत व्हावा, यासाठी वाहतूक यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. गर्दीमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी मेट्रो आणि रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त सेवा, सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी,” असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

Mumbai Local Updates: ऐन गर्दीच्या वेळी लोकलचा खोळंबा; वसई रोडपासून गोरेगावपर्यंत तांत्रिक बिघाडांची मालिका

Web Title: Ganeshotsav 2026 mumbai metro trips to increase no local train mega block mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Metro
  • Mumbai
  • Mumbai Local

संबंधित बातम्या

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ
1

Mira-Bhayandar News: जलकुंभात पालिका कर्मचाऱ्यांची कथित मद्यपार्टी? ‘हुल्लड डान्स’नंतर दारू-मटन पार्टीच्या आरोपाने खळबळ

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान
2

Virar Accident: भरधाव थार थेट घरात घुसली; भिंत कोसळून घरमालक जखमी, दोन दुचाकींचे नुकसान

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
3

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य
4

Devendra Fadnavis : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे, मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.