Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai New Railway Line : मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला मिळणार आणखी एक रेल्वे मार्ग

Mumbai New Railway Line : मुंबईकर रोज आपला जीव मुठीत घेऊन कामासाठी बाहेर जातात. दिवसेंदिवस वाढणारी गर्दी पाहता आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 15, 2026 | 04:53 PM
Western Railway (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Western Railway (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

मुंबई लोकलचा विस्तार करण्यात येत आहे.

रेल्वेच्या विस्तारासाठी अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत.

पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू मार्गाचे चौपदरीकरणांचे काम वेगाने सुरू

 

मुंबई आणि उपनगरांमध्ये रोज लाखो नागरिक लोकलने प्रवास करतात. दिवसेंदिवस वाढणारी प्रवाशांची संख्या पाहता रेल्वे व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. याच उद्देशाने विरार व डहाणू दरम्यान रेल्वे मार्गाचा मोठा विस्तार सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.

या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे वैतरणा नदीवरील नवीन रेल्वे पूल. या प्रकल्पासाठी सुमारे 628 लांबीचा पुल तयार होणार आहे. सर्व कामे वेळेत पूर्ण झाल्यास 2028 पर्यंत संपूर्ण प्रकल्प प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

रेल्वेच्या विस्तारासाठी अनेक ठिकाणी कामे….

रेल्वे मार्गाच्या विस्तारामुळे या भागातील वाहतुकीवर मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे. सध्या अनेक गाड्या एकाच मार्गावरून धावत असल्याने वेळापत्रकावर ताण येतो. अतिरिक्त मार्ग उपलब्ध झाल्यानंतर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या अधिक सुरळीत चालवता येतील. त्यामुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.

Indian Railways Big Decision : तुमचं घर रेल्वे ट्रॅकजवळ आहे का? मग ‘हे …

या संपूर्ण योजनेसाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. जवळपास 64 किलोमीटर अंतराच्या या रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी पूल, उड्डाणपूल आणि इतर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. काही ठिकाणी महत्त्वाची बांधकामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत.

पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू मार्गाचे चौपदरीकरणांचे काम वेगाने सुरू…

विरार स्थानकातही मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. काही प्लॅटफॉर्म अधिक रुंद करण्यात आले असून त्यांची लांबीही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रवास अधिक सोपा होईल. तसेच 12 डब्यांच्या लोकलसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे गर्दी कमी करण्यास मदत होईल.

या मार्गावरील वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड या स्थानकांमध्येही विकासकामे सुरू आहेत. नवीन स्थानक इमारती, पादचारी पूल, भुयारी मार्ग, लिफ्ट, सरकते जिने आणि आधुनिक सुविधा उभारल्या जात आहेत. विशेष म्हणजे बोईसर येथे नवीन स्थानकाची इमारत पूर्ण झाली असून ती लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

या रेल्वे विस्तारानंतर या संपूर्ण मार्गावर एकूण 16 स्थानके असतील. सध्या कार्यरत असलेल्या नऊ स्थानकांसोबत सात नवीन स्थानकांची भर पडणार आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक गावांना थेट रेल्वे सुविधा मिळेल. रोज कामासाठी किंवा शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होईल.

नवीन स्थानकांची नावे 

सध्या कार्यरत असलेली स्थानके म्हणजे विरार, वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड. याशिवाय वाधिवा, सरतोडी, माकुणसर, चिंटुपाडा, पांचाली, वंजारपाडा आणि बीएसईएस कॉलनी ही नवीन स्थानके या प्रकल्पात समाविष्ट केली जात आहेत.

Indian Railways Big Decision : तुमचं घर रेल्वे ट्रॅकजवळ आहे का? मग ‘हे …

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ रेल्वे सेवा सुधारेल असे नाही, तर संपूर्ण परिसराच्या विकासालाही चालना मिळेल. उद्योग, रोजगार, शिक्षण आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतील. रेल्वे प्रवास अधिक आरामदायी होण्यासोबतच भविष्यात वाढणाऱ्या प्रवाशांच्या गरजाही सहज पूर्ण करता येतील. त्यामुळे विरार ते डहाणू रेल्वे मार्गावरील हा बदल उत्तर मुंबई आणि पालघर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Web Title: Good news for mumbaikars city to get another railway corridor with 7 new stations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Mumbai Railway
  • transport

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.